फराह खान दरमहा कुकला देते ५० हजार पगार? जाणून घ्या दिलीपची सॅलरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:17 IST2026-04-01T10:16:20+5:302026-04-01T10:17:42+5:30

Farah khan: दिलीपची पहिली कमाई 300 रुपये इतकी होती.

farah-khan-tells-dilip-increasing-his-salary-to-rs-50000-latter-get-excited-also-earns-from-youtube | फराह खान दरमहा कुकला देते ५० हजार पगार? जाणून घ्या दिलीपची सॅलरी

फराह खान दरमहा कुकला देते ५० हजार पगार? जाणून घ्या दिलीपची सॅलरी

बॉलिवूडची लोकप्रिय कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान कलाविश्वासह सोशल मीडियावरही दमदार कामगिरी करत आहे.  त्यामुळे सध्या नेटकऱ्यामध्ये तिच्या युट्यूब व्लॉग्स चर्चा वरचेवर रंगत असते. फराह तिच्या प्रत्येक व्लॉगमध्ये तिचा कूक दिलीप याला आवर्जुन घेते. विशेष म्हणजे त्यांच्या जोडीला प्रेक्षकही भरभरून प्रेम देत आहेत. यामध्येच सध्या त्यांचा एक नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये फराहने दिलीपचा पगार ५० हजार रुपये दरमहा केल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

फराह आणि दिलीप यांच्या व्लॉगला प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. त्यामुळे अनेकदा फराह सेलिब्रिटींच्या घरीदेखील दिलीपला घेऊन जाते. इतंकच नाही तर ती दिलीपला तिच्या कुटुंबातील सदस्यासारखी वागणूक देते. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते. यामध्येच फराहने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या तिने दिलीपची पगार वाढ करुन त्याचं मासिक वेतन ५० हजार रुपये करणार असल्याचं वचन देते. फराहच्या या वक्तव्यानंतर दिलीपच्या आनंदाला पारावार उरत नाही. परंतु, इथेच खरा ट्विस्ट येतो. 

फराह आणि दिलीप नुकतेच अभिनेता जॅकी श्रॉफच्या घरी गेले होते. यावेळी त्यांची भेट जॅकीची लेक कृष्णासोबत झाली. कृष्णा अलिकडेच The 50 या शो मध्ये झळकली होती. त्यामुळे या शो विषयी बोलत असतांना तिने मजेमध्ये दिलीपला आता तुझा पगार The 50 सारखाच 50 हजार रुपये करते असं म्हटलं होतं. तिचे हे उद्गार ऐकून दिलीप खूश झाला. मात्र, लगेचच, ''कनीजच्या आशा बघा'', असं म्हणत गुगली टाकते. थोडक्यात, फराह खरोखरच त्याचा पगार वाढवणार नसून त्याची मस्करी करत होती. मात्र, खऱ्या आयुष्यात फराहने दिलीपला प्रचंड मदत केली आहे.

किती आहे दिलीपचा पगार?

दिलीप पहिल्यांदा कामानिमित्त दिल्लीत आला होता. त्यावेळी त्याचा पगार ३०० रुपये होता. त्यानंतर त्याला फराहच्या घरी काम करायची संधी मिळाली. त्यावेळी फराहने त्याला ३०० रुपयांवरुन थेट २० हजार रुपये दरमहिना पगार देण्यास सुरुवात केली. सध्यस्थितीत त्याचा पगार आता बराच वाढला आहे. इतकंच नाही तर तो फराहसोबत युट्यूबच्या माध्यमातूनही आर्थिक कमाई करतो. फराह तिच्या युट्यूब व्हिडीओमधून मिळणाऱ्या रक्कमेचा काही भाग दिलीपला देते.

Web Title : फराह खान ने कुक दिलीप को 50,000 वेतन देने पर छेड़ा।

Web Summary : फराह खान ने अपने व्लॉग में अपने कुक दिलीप के वेतन को ₹50,000 तक बढ़ाने का मज़ाक उड़ाया। शुरू में गंभीर दिखने के बाद, उसने खुलासा किया कि यह एक मजाक था, हालाँकि वह वास्तव में उसका सम्मान करती है और समर्थन करती है। दिलीप का वेतन ₹300 से शुरू हुआ और फराह के घर में शामिल होने के बाद काफी बढ़ गया।

Web Title : Farah Khan teases cook Dilip about a 50,000 salary.

Web Summary : Farah Khan playfully hinted at increasing her cook Dilip's salary to ₹50,000 in her vlog. While initially appearing serious, she revealed it was a joke, though she genuinely values and supports him. Dilip's salary started at ₹300 and increased significantly after joining Farah's household.