"दोन वेळा आयव्हीएफ अयशस्वी झाले अन्...", फराह खानने सांगितला प्रेग्नंसीचा 'तो' कठीण काळ , म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:30 IST2025-10-31T09:28:21+5:302025-10-31T09:30:26+5:30
फराह खानने सांगितला प्रेग्नंसीचा कठीण काळ , म्हणाली- "खूप रडायचे..."

"दोन वेळा आयव्हीएफ अयशस्वी झाले अन्...", फराह खानने सांगितला प्रेग्नंसीचा 'तो' कठीण काळ , म्हणाली...
Farah Khan: फराह खानबॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शिका निर्माती आणि अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फराह तिच्या दिलखुलास स्वभावामुळे देखील चर्चेत असते. फराहने २००४ साली शिरिष कुंदरशी लग्न केलं. या जोडप्याला जोडप्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शिरिष आणि तिच्या वयामध्ये साधारण ८ वर्षाचं अंतर होतं. सध्या फराह खान एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.या मुलाखतीमध्ये तिने आई होण्यासाठी केलेल्या प्रवासातील आव्हानांबद्दल आणि अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे.
फराहला ४० व्या वर्षी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली होती. ओम शांती ओम च्या सेटवर असताना आपण गरोदर असल्याचं तिला कळलं होतं. ही आनंदाची बातमी कुटुंबाहेर पहिल्यांदा कोणाला दिली असेल तर तो शाहरुख होता असं तिने या पॉडकास्टमध्ये सांगितलं. अलिकडेच फराह खान सानिया मिर्झाच्या 'सर्व्हिंग इट अप विथ सानिया' या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यात चर्चेदरम्यान फराहने तिच्या प्रेग्नन्सींकाळाविषयी तसंच आयव्हीए प्रक्रियेदरम्यानच्या शारिरीक त्रासाविषयी सांगितलं. त्याबद्दल बोलताना फराह म्हणाली," ओम शांती ओमच्यावेळी मी बाळासाठी देखील प्रयत्न करत होते.शाहरुख दरवर्षी जून-जुलैच्या महिन्यात त्याच्या मुलांबरोबर व्हेकेशनसाठी जातो, तेव्हा सुद्धा त्याने ब्रेक घेतला होता.त्याचा हा निर्णय माझ्यासाठी वरदान ठरला. याचदरम्यान, मी आयव्हीएफ प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. दोन वेळा आयव्हीएफची प्रक्रिया गेली पण तिसऱ्यांदा यशस्वी झाली. "
पुढे फराह म्हणाली," जेव्हा आयव्हीएफ प्रक्रिया अयशस्वी झाली तेव्हा मी खूपच टेंन्शमध्ये आले होते. दोन दिवस अंथरुणावर पडून राहिले होते आणि रडायचे. त्यावेळी शिरीषने मला धीर दिला. तो म्हणाला, 'आपल्या मूल नाही झालं तरी काही फरक पडणार नाही'. पण मला माहित होतं त्याला पण बाप व्हायचं होतं. तो लहान मुलांबरोबर जितका वेळ घालवू शकतो तितका कोणसोबतही तो राहू शकत नाही."
पतीने दिली साथ...
"इतकंच नाहीतर या प्रेग्नंसीमध्ये शिरीषने माझी खूप काळजी घेतली. तीन मुलांना मी जन्म देणार होते. त्यामुळे सारखी उल्टी व्हायची, वॉशरुमला सारखं जावं लागत असे. तसेच झोपताही यायचं नाही. मी रेकलाइनवर झोपायचे. जे कोणताही पती करणार नाही ते शिरीषने माझ्यासाठी केलं आहे. तो मला आंघोळ घालायचा, त्याने माझं सगळं केलं. " या मुलाखतीत पतीबद्दलअसे कौतुगौद्गार देखील तिने काढले.