अन् 'त्या' सीनवेळी सलमान ढसाढसा रडला, फराह खानने सांगितला किस्सा, म्हणाली-"तेव्हा त्याच्या आयुष्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:13 IST2026-03-16T15:58:39+5:302026-03-16T16:13:24+5:30
न्यूयॉर्क ब्रुकलीन ब्रीज अन् भर शूटिंगदरम्यान सलमान ढसाढसा रडलेला, फराह खान खुलासा करत म्हणाली...

अन् 'त्या' सीनवेळी सलमान ढसाढसा रडला, फराह खानने सांगितला किस्सा, म्हणाली-"तेव्हा त्याच्या आयुष्यात..."
Farah Khan : लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खान हे नाव सिनेरसिकांसाठी नवीन नाही.ओम शांती ओम तसेच हॅप्पी न्यू इअर असे उत्तमोत्तम सिनेमांचं दिग्दर्शन तिने केलं आहे. तसेच बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं आहे. फराह खानचा हा प्रवास फार मोठा आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फराह खानने २००६ साली आलेल्या जान ए मन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा सलमानचा किस्सा शेअर केला आहे.
जान ए मन या चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खानचे पती शिरीष कुंदर यांनी केलं होतं. त्याचबरोबर चित्रपटामध्ये अक्षय कुमार, प्रीती झिंटा आणि सलमा खानची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, पण त्यातील 'सौ दर्द' आणि 'हमको मालूम है' ही गाणी चांगलीच गाजली. यातील एक गाणं ज्यात न्यूयॉर्क ब्रुकलीन ब्रीजचं दृश्य दाखवण्यात आलं आहे. या ब्रीजवर सलमानचा इमोशनल सीन आहे, तो रडताना दिसला. 'सौ दर्द है' हे गाणं त्या ब्रीजवर शूट करण्यात आलं होतं. या गाण्यात सलमान खरोखर रडल्याचं फराह खानने सांगितलं.
अलिकडेच रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत फराह खान म्हणाली, "सौ दर्द है' गाण्याच्या शूटिंगदरम्यान, सलमानला मी पहिल्यांदाच त्याच्या वेदना अशा पद्धतीने व्यक्त करताना पाहिलं होतं. त्यावेळी सलमान खरोखर सेटवर ढसाढसा रडत होता. विशेष म्हणजे त्याने ग्लिसरिन वगैरे काहीच वापरलं नव्हतं."
त्यानंतर मग पुढे फराह म्हणाली, "त्या गाण्यामध्ये सलमानच्या डोळ्यात अश्रू पूर्णपणे खरे होते. ज्यामुळे तो सीन अगदीच खरा वाटला. त्यावेळी त्याच्या आयुष्यात काय चाललं होतं त्याची मलाही कल्पना नव्हती. पण, सलमानला त्याचं असं पहिल्यांदाच पाहिलं होतं." असा खुलासा फराह खानने केला.