Funny Video : एवढं घेतलं डिस्काऊंट द्या की...; फराह खानचा विदेशी रेस्टॉरंटमध्ये देशी जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:13 IST2022-04-11T16:13:16+5:302022-04-11T16:13:53+5:30
Farah Khan Video : होय, न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये फराहने जे काही केलं ते पाहून करण जोहरला सुद्धा क्षणभर लाजीरवाणं वाटलं.

Funny Video : एवढं घेतलं डिस्काऊंट द्या की...; फराह खानचा विदेशी रेस्टॉरंटमध्ये देशी जुगाड
करण जोहर (Karan Johar) व फराह खान (Farah Khan ) एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. सध्या दोघंही न्यूयॉर्कमध्ये धम्माल करत आहेत. इथले फनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या करणने शेअर केलेल्या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे.
होय, न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये फराहने जे काही केलं ते पाहून करण जोहरला सुद्धा क्षणभर लाजीरवाणं वाटलं. पण फराहने अगदी बिनधास्त आणि जराही न लाजता भारतीयांची ‘डिस्काऊंट’ मागण्याची हौस भागवून घेतली.
तर त्याचं झालं असं की,करण व फराह न्यूयॉर्कच्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलेत. इथे फराहनं एक पदार्थ ऑर्डर केला. ऑर्डर मिळाल्यावर फराहने काय केलं तर चक्क या पदार्थावर फ्री स्नॅक्स मिळेल का, असा प्रश्न हॉटेलच्या कर्मचार्याला केला. बाई डिस्काऊंट मागतेय, हे पाहून त्या कर्मचार्याला काय बोलावं तेच कळेना. तो बिचारा नुसता फरहाकडे टकामका पाहत राहिला. करणने हा फनी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकर्यांना हसू अनावर झालंय.
या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ती (फराह) फार रिअल आहे, असं एकाने लिहिलं आहे. डिस्काउंट तर सर्वांनाच हवा असतो. मात्र तो मागण्याचे धाडस फार कमीजण दाखवतात असं अन्य एकाने म्हटलं आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर फराह अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसते. अलीकडे ती ‘खतरा खतरा शो’मध्ये सहभागी झाली होती. करणचे म्हणाल तर सध्या तो ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात बिझी आहे. यात रणवीर सिंग व आलिया भट लीड रोलमध्ये आहेत. याशिवाय हुनरबाज हा रिअॅलिटी शो सुद्धा तो जज करतोय.