४६ वर्षीय विद्या बालनचा नवा लूक पाहून चाहते झाले थक्क, म्हणाले - "नॅचरल ब्युटी.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:07 IST2025-07-15T18:06:38+5:302025-07-15T18:07:02+5:30
Vidya Balan : अभिनेत्री विद्या बालनने नुकतेच एका मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी फोटोशूट केले, ज्यामध्ये तिच्या नवीन हेअरस्टाईल आणि ग्लॅमरस लूकने सर्वांना चकित केले.

४६ वर्षीय विद्या बालनचा नवा लूक पाहून चाहते झाले थक्क, म्हणाले - "नॅचरल ब्युटी.."
बॉलिवूडची 'उलाल गर्ल' म्हणजेच अभिनेत्री विद्या बालन(Vidya Balan)ने नुकतेच एका मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी केलेल्या फोटशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. नुकतेच विद्या बालनने मॅगझिन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले. फोटो पाहून चाहते ४६ वर्षीय अभिनेत्रीच्या दमदार लूकवर प्रेमात पडले आहेत.
मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या विद्या बालनची आणखी एक कव्हर स्टोरी आली आहे. 'अ फोर्स टू रेकन विथ विद्या बालन' नावाची कव्हर स्टोरी पुरुषप्रधान इंडस्ट्रीत सिनेमाचा व्यवसाय पुढे नेण्यावर आधारित आहे. कव्हरवर, विद्याने डीप नेक असलेला लाल रंगाचा गाऊन, तपकिरी केस आणि किमान दागिने घातले आहेत. तिच्या लूकने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विद्याचं नवीन फोटोशूट चर्चेत
सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्मवर विद्या बालनचे फोटो शेअर झाल्यानंतर, लोकांनी कमेंट केली की अभिनेत्री तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसते. एकाने म्हटले, व्वा, ती सुंदर दिसते. दुसऱ्याने म्हटले की, दमदार!! तिच्याकडे अशी स्टाईल करण्याची क्षमता आहे आणि तिने त्यात अधिक प्रयोग करावेत. अनेकांनी बोटोक्स आणि सर्जरीच्या जगात तिला नॅचरल ब्युटी म्हटलंय. अनेकांनी म्हटले की सध्याच्या बॉलिवूड कलाकारांनी तिच्याकडून प्रेरणा घ्यावी.