ट्रेंड फॉलो करत अक्षरं जुळवली, सिद्धार्थ-कियाराच्या लेकीसाठी चाहत्यांनी सुचवली नावं! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:22 IST2025-07-16T14:19:48+5:302025-07-16T14:22:18+5:30
दोघांच्या नावातील अक्षर जुळवली अन्...; सिद्धार्थ-कियाराच्या लेकीसाठी चाहत्यांनी सुचवली सुंदर नावं, तुम्हाला कोणतं आवडलं?

ट्रेंड फॉलो करत अक्षरं जुळवली, सिद्धार्थ-कियाराच्या लेकीसाठी चाहत्यांनी सुचवली नावं! म्हणाले...
Siddharth Malhotra and kira Advani Baby Girl : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि त्याची पत्नी कियारा अडवाणी (Kira Advani) हे इंडस्ट्रीतील स्टार कपल म्हणून ओळखलं जातं. नुकतंच या जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. अशातच सध्या संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच कियारा आणि सिद्धार्थच्या कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
कियारा अडवाणीने काल मंगळवारी गिरगाव येथील एच.एन.रिलायन्स रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. कियारा आणि तिची लेक दोघींचीही प्रकृती उत्तम आहे. कियारा-सिद्धार्थला मुलगी झाल्यानंतर आता हे कपल चिमुकलीचं नाव काय ठेवणार? याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे. कियारा अडवाणी आई झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट समोर येत आहेत. स्टुडंट ऑफ द इयर मधील आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिन्ही कलाकार आता वैवाहिक आयुष्यात स्थिरावले असून, तिघांच्या घरीही मुलींचा जन्म झाला. असं कनेक्शन चाहते जोडत आहेत.
सध्या सोशल मीडियावर 'Filmy Gyan' ने एक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थ आणि कियाराच्या लेकीचं नाव काय असेल? या पोस्टवर सिद्धार्थ-कियाराच्याअनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या लेकीसाठी नावं सुचवलं आहे. त्यांच्या नावांची अक्षरं जुळवत एका चाहतीने कमेंट करत सियारा हे सुंदर नाव सजेस्ट केलंय. तर आणखी एका यूजरने सारा नावंही छान आहे. याशिवाय आणखी एका युजरने 'सितारा' असं नाव सुचवलं आहे. दरम्यान, सिद्धार्थ-कियाराच्या घरी चिमुकलीच्या आगमनानंतर चाहते खुश झालेत एवढं मात्र नक्की!