बाईक अन् ट्रकच्या जोरदार धडकेत प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, आणखी ९ जणही दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 18:26 IST2024-02-26T18:23:39+5:302024-02-26T18:26:46+5:30
प्रसिद्ध गायकाचा इतका भीषण अपघात झाला की त्याच्यासकट ९ जणं जागीच गतप्राण झाले

बाईक अन् ट्रकच्या जोरदार धडकेत प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, आणखी ९ जणही दगावले
प्रसिद्ध गायक छोटू पांडेचं निधन झालंय. बिहार येथील सासाराम येथील झालेल्या भीषण अपघातात छोटू पांडे आणि त्यांचे सहकारी मृत्युमुखी पडले. याशिवाय एकूण ९ लोकांंचं निधन झालंय. छोटू त्याचे मित्र आणि अन्य काही लोकांसोबत वाराणसी येथील एका लग्नाला उपस्थित राहणार होता. परंतु त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे संगीतविश्वाला मोठा धक्का बसलाय.
बिहार येथील कैमूर भागात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. मोहनिया येथे एका बाईकस्वाराला वाचवण्यासाठी स्कॉर्पीयो गाडी डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की यात ९ लोकं जागीच मृत्युमुखी झाले. घटनेनंतर पोलिसांनी तपास करत मृत व्यक्तींना गाडीबाहेर काढलं आणि त्यांची ओळख पटवली. बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील ६ माणसं या अपघातात गतप्राण झाली.
कैमूर में सड़क हादसे में हमारे बक्सर जिले के भोजपुरी कलाकार Chhotu Pandey और उनकी टीम के 7 लोगों के मौत की खबर सुनकर मन दुखित हुआ ,
— आशीष भंडारी ओझा (@SonOfBuxar) February 25, 2024
हे ईश्वर 😭😭🙏 #KaimurNewspic.twitter.com/Xu4kzpjgnv
या अपघातात छोटू पांडेचं निधन झालं. याशिवाय प्रकाश राय, अनु पांडे, सत्य प्रकाश मिश्रा, बजेश पांडे, आणि शशि पांडे यांचाही मृत व्यक्तींमध्ये समावेश आहे. या अकस्मात निधनाने भोजपुरी संगीतविश्वावर आणि मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.