बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 18:21 IST2025-09-21T18:19:07+5:302025-09-21T18:21:56+5:30

फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? तिची ९ दिवसात किती कमाई होते? जाणून घ्या एका क्लिकवर

Falguni Pathak fees and earning in navratri nine days mumbai navratri show ticket price | बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

बापरे बाप! फाल्गुनी पाठक एका शोसाठी घेते 'इतके' पैसे; फक्त ९ दिवसात कोट्यावधींची कमाई करते

'गरबा क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका म्हणजे फाल्गुनी पाठक. यंदाच्या नवरात्रीतही आपल्या धमाकेदार कार्यक्रमांनी फाल्गुनी चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहेत. यावर्षी 'रेडियन्स दांडिया नवरात्री उत्सव २०२५' नावाने मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वर्षभराची मोठी कमाई करते. जाणून घ्या फाल्गुनीच्या शोची फी आणि तिच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत किती असते

फाल्गुनीची एकूण कमाई

विविध माध्यमांच्या रिपोर्टनुसार, फाल्गुनी पाठक नवरात्रीच्या एका रात्रीच्या कार्यक्रमासाठी सुमारे २० ते २५ लाख रुपये मानधन घेते. यानुसार, नवरात्रीच्या नऊ दिवसांत तिची एकूण कमाई कोट्यावधींच्या घरात जाते. यामुळे, फाल्गुनी पाठक ही भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गरबा गायकांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये फाल्गुनी पाठक १.४ कोटींची कमाई करते. फाल्गुनीने गायलेल्या गाण्यांची क्रेझ आणि तिची लोकप्रियता अशा अनेक गोष्टींचा तिला फायदा होतो. याशिवाय तिचे नाईट शो रात्री उशीरापर्यंत चालू असतात. त्यामुळेच तिच्या शोला प्रचंड गर्दी होते आणि फाल्गुनीची चांगली कमाई होते.


तिकिटांचे दर आणि कार्यक्रमाचे स्वरूप

या वर्षी फाल्गुनीच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत १७९९ रुपयांपासून ते तब्बल दीड लाखांपर्यंत आहे. या शोमध्ये सिंगल डे पास, सिझन पास आणि ग्रुप तिकीट असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, दररोज रात्री ८ वाजता हा शो सुरू होईल. यात फाल्गुनी पाठक स्वतः गाणार आहे. विशेष म्हणजे ज्यांनी महागडं तिकिट खरेदी केलंय त्यांना विशेष अशा LED लाईट असलेल्या दांडिया स्टिक देण्यात येतील. एकूणच फाल्गुनी नवरात्रीच्या नऊ दिवसात पुढे वर्षभर पुरेल, इतकी भरघोस कमाई करते. 

Web Title: Falguni Pathak fees and earning in navratri nine days mumbai navratri show ticket price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.