'धुरंधर २' मध्येही असेल बहरीन स्वॅग? गायक फ्लिपरॅची हिंट देत म्हणाला-"पुढच्या भागात काहीतरी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:29 IST2026-01-07T15:23:02+5:302026-01-07T15:29:38+5:30
अक्षय खन्नाला तालावर नाचवणारा फ्लिपरॅची 'धुरंधर २' साठी देणार आवाज? म्हणाला...

'धुरंधर २' मध्येही असेल बहरीन स्वॅग? गायक फ्लिपरॅची हिंट देत म्हणाला-"पुढच्या भागात काहीतरी..."
Flipperachi Reaction On Dhurandhar 2: रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर' हा सिनेमा प्रदर्शित होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, अजुनही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे आदित्य धरच्या या सिनेमाचं कौतुक होत असताना त्यातील गाणी देखील सोशल मीडियावर ट्रेंडिग मध्ये आहेत. त्यातील चर्चेत असलेलं गाणं म्हणजे शेर ए बलूच. 'धुरंधर' सिनेमामुळे चांगलंच व्हायरल झालंय.या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेल्या डान्सची देखील हत्यांमध्ये तितकीच क्रेझ निर्माण झाली.
धुरंधर मधल्या या गाण्याचं मुळनाव 'Fa9la' असं आहे.चित्रपटामुळे या गाण्याला आणखीनच लोकप्रियता मिळाली आहे. Fa9la' हे गाणं बहरीनचा प्रसिद्ध गायक फ्लिपरॅचीने हे गाणं गायलं आहे.धुरंधरच्या पहिल्या भागात आपल्या तालावर अक्षय खन्नाला नाचवणारा हा गायक दुसऱ्या भागासाठी एखादं गाणे गाणार का अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. यावर खुद्द फ्लिपरॅचीने हिंट दिली आहे. इंडिया टुडेसोबत संवाद साधताना गायक खुलासा करत म्हणाला, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे खूपच क्रेझी आहे. मला अनेकांचं डीएम्स येत आहेत. माझं जगभरातून इतके लोक मला टॅग करत आहेत की त्यामुळे मी आताच ही परिस्थिती सांभाळू शकत नाही. लोक गाणं एन्जॉय करत आहेत. खूपच भारी वाटतंय."
त्यानंतर धुरंधरच्या दुसऱ्या भागासाठी फ्लिपरॅची कोणतं गाणं गाणार का असं विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना गायक म्हणाला,"काहीही घडू शकतं. मला ही गोष्ट सरप्राईज ठेवायची होती. पण, नक्कीच काहीतरी असेल. मला याबद्दल काही बोलायचं नव्हतं. पण, पुढच्या भागात काहीतरी इंटरेस्टिंग असेल." असा खुलासा त्याने केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.