Video : बॉलिवूड पार्टीत दिसल्या मिसेस ठाकरे, जया बच्चन यांच्याबरोबर रश्मी ठाकरेंनी फोटोसाठी दिल्या पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 11:02 IST2023-10-17T11:02:10+5:302023-10-17T11:02:36+5:30

हेमा मालिनींच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते मिसेस ठाकरेंनी.

ex cm uddhav thackeray wife rashmi thackeray attend hema malini birthday party pose with jaya bachchan | Video : बॉलिवूड पार्टीत दिसल्या मिसेस ठाकरे, जया बच्चन यांच्याबरोबर रश्मी ठाकरेंनी फोटोसाठी दिल्या पोझ

Video : बॉलिवूड पार्टीत दिसल्या मिसेस ठाकरे, जया बच्चन यांच्याबरोबर रश्मी ठाकरेंनी फोटोसाठी दिल्या पोझ

सेलिब्रिटींच्या बॉलिवूड पार्टी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. बॉलिवूड पार्टीतील कलाकरांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकतंच ड्रीम गर्ल हेमा मालिनींच्या बर्थडेचं ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आलं. हेमा मालिनींच्या बर्थडे पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते मिसेस ठाकरेंनी. हेमा मालिनींच्या बर्थडेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. 

रश्मी ठाकरेंनी या बर्थडे पार्टीसाठी खास लूक केला होता. हेमा मालिनींच्या बर्थडे पार्टीसाठी रश्मी ठाकरे साडी नेसून आल्या होत्या. त्यांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या पार्टीतील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या जया बच्चन यांच्याबरोबर पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन रश्मी ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

हेमा मालिनींनी त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनींनी धर्मेंद्र आणि ईशा, अहाना देओल यांच्याबरोबर केक कापून वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन केलं. त्यांच्या या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. जया बच्चन, रेखा, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, राणी मुखर्जी, विद्या बालन या सिनेतारकांनी बर्थडे पार्टीला चार चांद लावले. 

Web Title: ex cm uddhav thackeray wife rashmi thackeray attend hema malini birthday party pose with jaya bachchan