बॉलिवूडमध्ये झळकण्यापूर्वीच हिना खान ठरते कॉपी कॅट, पाहा कशी आणि कोणाची करते कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 21:00 IST2019-12-22T21:00:00+5:302019-12-22T21:00:00+5:30
अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली हिना तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय आपल्या फिटनेसमुळे अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देत आहे.

बॉलिवूडमध्ये झळकण्यापूर्वीच हिना खान ठरते कॉपी कॅट, पाहा कशी आणि कोणाची करते कॉपी
'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अक्षराच्या रुपात घराघरांत पोहोचलेली हिना स्टायलिश व्हॅम्पच्या रुपात एकता कपूरच्या कसौटी जिंदगी की मालिकेत दिसली. हिना खानला आजही तिचे चाहते 'अक्षरा बहु' याच नावाने जास्त ओळखतात. त्यामुळे आता त्याच साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने वेगवेगळे रिअॅलिटी शोही केले. आता लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'रांझणा' सिनेमात ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. या कारणामुळेही ती सध्या चर्चेत आहे.
फिटनेस, सौंदर्य आणि अभिनयामुळे रसिकांची लाडकी अभिनेत्री आहे.सोशल मीडियावरही तिचा प्रचंड चाहता वर्ग आहे.यातच तिचा आणखीन एक फोटो समोर आला आहे. यात तिने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केल्याचे पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे हा ड्रेस पाहताच तिला सारेच कॉपी कॅट म्हणून बोलत आहे. यावेळी हिनाने परिधान केलेला ड्रेस अभिनेत्री नोरा फतेहीच्या ड्रेस सारखा ड्रेस डिझाइन करून घेतला. यामुळे तिला कॉपी कॅट म्हणून सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे.
तसेच काही दिवसांपूर्वीच दिल्लीत एका इव्हेंटसाठी हीना गेली होती. एअरपोर्टवर तिला विना मेकअप पाहिले गेले. हीनाला मीडियाच्या कॅमे-यांनी घेरताच तिनेही अशा रितीने पोज वर पोज दिल्या. तसेच मात्र यावेळी कॅमे-यात कैद झालेले फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा मात्र नेटीझन्सने तिला ट्रोल केले. तिचा हा विनामेकअप लूक फारसा आवडलेला नसून काहींनी तर तिला ''मोहल्ले की आंटी'' अशा प्रतिक्रीया दिल्याचे पाहायला मिळाले.
अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली हिना तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय आपल्या फिटनेसमुळे अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देत आहे. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी ती बरीच मेहनत घेते.तिच्या इन्स्टाग्राम पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. हे फोटो पाहून तुम्हीही फिदा नाही झाले तरच नवल.