प्रसिद्ध भारतीय गायकचा कार अपघात, थोडक्यात वाचला जीव; धक्कादायक VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:43 IST2025-07-22T15:43:10+5:302025-07-22T15:43:30+5:30
अपघाताचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

प्रसिद्ध भारतीय गायकचा कार अपघात, थोडक्यात वाचला जीव; धक्कादायक VIDEO व्हायरल
Emiway Bantai: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक प्रसिद्ध भारतीय गायक स्टंट करताना कारच्या खिडकीतून थेट बाहेर फेकला गेल्याचं दिसत आहे. ही घटना स्टंट दरम्यान घडली असून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात गायकचा जीव वाचला आहे.
हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. थोडक्यात बचावलेला हा प्रसिद्ध गायक एमीवे बंटाई हा आहे. तो एका नव्या गाण्याचं शुटींग करत स्टंट करत होता. यावेळी एमीवे बंटाई धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर फेकला. या संपुर्ण घटनेचा व्हिडीओ एमीवे बंटाई यानेच त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. व्हिडीओमध्ये दिसतंय की एमीवे चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला आहे. त्याचवेळी कार अचानक जागेवर थांबते आणि बेसावध असलेला एमीवे बंटाई तोल गमावून चालत्या कारमधून बाहेर तोंडावर आपटतो.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीचं एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्ध स्टंटमन एस.एम राजूचा कारच्या स्टंटदरम्यान मृत्यू झाला. स्टंटमॅन राजू उर्फ मोहनराज एक SUV कार चालवत होते. जी एका रॅपवरून चालवताना पुढे जाऊन पलटली. त्यानंतर त्यांची कार खाली कोसळली आणि पुढील भाग जमिनीवर आदळली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असतानाच एक अशाच एका विचित्र अपघातातून अगदी थोडक्यात बचावला आहे. ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की स्टंट करताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा क्षणात जीवावर बेतू शकतं.