'इमर्जन्सी'वर CBFC ची कात्री; अखेर कंगना राणौत म्हणाली- "कोणाचीही मस्करी केली नाहीये तरीही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:47 IST2025-01-08T16:46:57+5:302025-01-08T16:47:53+5:30
'इमर्जन्सी' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने कट्स सुचवल्याने कंगना राणौतने तिची प्रतिक्रिया दिली आहे (kangana ranaut, emergency)

'इमर्जन्सी'वर CBFC ची कात्री; अखेर कंगना राणौत म्हणाली- "कोणाचीही मस्करी केली नाहीये तरीही..."
कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा पुढील काही दिवसात रिलीज होणार आहे. कंगना राणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. कंगनाचा हा सिनेमा २०२४ मध्ये जून महिन्यात रिलीज होणार होता. त्यानंतर सिनेमा ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. अखेर सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला हिरवा कंदील दिल्याने आता जानेवारी २०२५ मध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. सेन्सॉर कट्ससहित सिनेमा रिलीज झाल्याने कंगनाने तिचं मत व्यक्त केलंय.
कंगना राणौतने CBFC द्वारे 'इमर्जन्सी' सिनेमाला लावलेल्या कात्रीवर तिचं मत व्यक्त केलंय. कंगना म्हणाली की, "मला आनंद आहे की, मला सिनेमात जे दाखवायचंय होतं ते मला दाखवता आलंय. सेन्सॉरने काही कट्स सुचवल्याने त्रास नक्कीच झाला. आम्ही 'इमर्जन्सी' सिनेमा कोणाची मस्करी करायचीय या उद्देशाने बनवला नाहीये. या सिनेमात ज्या तथ्य गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही सीन्स कट झाले असले तरीही सिनेमा अपेक्षित परिणाम साधेल."
कंगना राणौत पुढे म्हणाली की, "आमची कथा सुरक्षित आहे. कट्स असले तरीही इमर्जन्सी सिनेमाचा प्रभाव प्रेक्षकांवर पडेल याची मला खात्री आहे. जर सेन्सॉर बोर्डाने काही प्रसंगांना हटवलं नसतं तर प्रेक्षकांना आम्ही विशिष्ट प्रसंग सिनेमात का ठेवले आहेत हे कळलं असतं." दरम्यान कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. या सिनेमात कंगनासोबत अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण हे कलााकार दिसणार आहेत.