Ekta Kapoor: ‘त्या’ दिवशी चंकीने जरा भाव दिला असता तर आज एकता कपूरही असती ‘बॉलिवूड वाईफ’...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 16:15 IST2022-09-27T16:13:03+5:302022-09-27T16:15:07+5:30
Chunky Pandey : काल चंकीच्या वाढदिवसाचं झक्कास सेलिब्रेशन झालं. टीव्हीची क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor ) हिनेही चंकीला बर्थ डे विश केलं. पण तिच्या बर्थ डे पोस्टने लोकांना हैराण केलं...

Ekta Kapoor: ‘त्या’ दिवशी चंकीने जरा भाव दिला असता तर आज एकता कपूरही असती ‘बॉलिवूड वाईफ’...!!
बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे ( Chunky Pandey) कालच (26 सप्टेंबर) 60 वर्षांचा झाला. 1987 साली ‘आग ही आग’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणाऱ्या चंकीच्या वाढदिवसाचं झक्कास सेलिब्रेशन झालं. चंकीच्या बर्थ डे पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. टीव्हीची क्वीन एकता कपूर (Ekta Kapoor ) हिनेही चंकीला बर्थ डे विश केलं. पण तिच्या बर्थ डे विशने लोकांना हैराण केलं.
चंकीला बर्थ विश करत एकता कपूरने एक इन्स्टास्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चंकीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोवर लिहिलेल्या वाक्यांनी मात्र सगळ्याच्याच भुवया उंचावल्या. ‘जेव्हा मी चंकी पांडेला पाहून ब्लश करायची, त्याने रिअॅक्ट केलं असतं तर मी सुद्धा आज बॉलिवूड वाईफपैकी एक असती, हॅपी बर्थ डे,’असं तिने या फोटोंवर लिहिलं. या फोटोओळींनी अनेकांना हैराण केलं.
चंकीने पहलाज निहलानी यांच्या ‘आग ही आग’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि चंकीला ओळख मिळाली. यानंतर चंकीने पाप की दुनिया, खतरों के खिलाड़ी, जहरीले आणि आंखें यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलं. 1988 साली आलेल्या तेजाब चित्रपटात चंकीने अनिल कपूरच्या मित्राची भूमिका केली होती यासाठी त्याला फिल्मफेअर बेस्ट सपोर्टींग अॅक्टरचा पुरस्कारही मिळाला.
बॉलिवूडमध्ये येण्याअगोदर चंकी 1986 साली अॅक्टींग स्कुलमध्ये इंस्ट्रक्टरचं काम करायचा. सध्या चंकी पत्नी भावनासोबत फूड रेस्तरॉ चालवतो. खार येथे असलेल्या या रेस्तरॉचं नाव ‘द एल्बो रूम’ आहे. याशिवाय बॉलिवूड इलेक्ट्रिक नावाची त्याची इवेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. ही स्टेजशो साठी ओळखली जाते.