Ekta Kapoor : "मी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, तुला वडील नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:00 IST2024-12-30T15:00:20+5:302024-12-30T15:00:51+5:30

Ekta Kapoor : एकता कपूर एका कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाली की, माझ्याकडे अनेक लोक होते जे आम्हाला सल्ला देत होते.

Ekta Kapoor talks about her son ravie having no father says she is not perfect mother | Ekta Kapoor : "मी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, तुला वडील नाहीत"

Ekta Kapoor : "मी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला सांगितलं होतं की, तुला वडील नाहीत"

एकता कपूरने लग्न केलेलं नाही. ती एका मुलाची आई आहे. तिने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. आपल्या मुलाला वडिलांचं प्रेम मिळणार नाही याचं दु:खही एकताला आहे. एका कार्यक्रमात ती तिच्या गिल्टबद्दल बोलली. तिने असंही सांगितलं की, ती एक परफेक्ट आई बनू शकणार नाही कारण परफेक्शन सारखी काही गोष्टच नसते.

एकता कपूर एका कॉन्क्लेव्हमध्ये म्हणाली की, माझ्याकडे अनेक लोक होते जे आम्हाला सल्ला देत होते. मी माझ्या मुलाशीही बोलले होते. मी माझ्या ७ महिन्यांच्या मुलाला सांगितलं  होतं की, तुला वडील नाहीत आणि मी तुझ्याबरोबर शिकत आहे. मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. पण परफेक्शन हा भ्रम आहे आणि मी परफेक्ट आई होऊ शकत नाही.

एकताने ट्विटरवर एक नोट शेअर केली होती की, ती सात वर्षांपासून कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या डॉक्टरांनी तिला फर्टिलिटीचे अनेक पर्याय दिले. आई होण्यासाठी तिने वयाच्या ३६ व्या वर्षी एग फ्रीज केले.

एकता कपूर सरोगसीच्या मदतीने दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमीही पसरली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एकताच्या ओळखीच्या व्यक्तीने ही बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. पत्रकारांनी अशा गोष्टी प्रसिद्ध करण्यापूर्वी पडताळून पाहा, असंही सांगण्यात आलं.
 

Web Title: Ekta Kapoor talks about her son ravie having no father says she is not perfect mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.