ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुनचा नवीन फोटो आला समोर, चाहते झाले खुश्श!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 18:00 IST2024-01-06T17:59:47+5:302024-01-06T18:00:15+5:30
Malaika Arora - Arjun Kapoor : ब्रेकअपच्या वृत्तांदरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कॉमन फ्रेंड करिश्मा करमचंदानीच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये एकत्र पाहायला मिळाले.

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुनचा नवीन फोटो आला समोर, चाहते झाले खुश्श!
मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर(Arjun Kapoor)च्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला होता. अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये मलायका-अर्जुनचे दोन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाल्याचा दावा केला जात आहे. मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपची बातमीही तेव्हा समोर आली जेव्हा फराह खानने मलायका अरोराला झलक दिखला जा ११च्या सेटवर तिच्या लग्नाच्या प्लॅनबद्दल विचारले, तेव्हा मलायका अरोराने तिला सिंगल असण्याचे संकेत दिले. पण ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, मलायका आणि अर्जुन कपूरचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहते खूष झाले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रेकअपच्या वृत्तांदरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कॉमन फ्रेंड करिश्मा करमचंदानीच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचा एक भाग बनले होते. करिश्मा करमचंदानीच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मलायकासोबत अर्जुन, सोनम कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि अवंतिका मलिक या फोटोंमध्ये दिसत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अर्जुन आणि मलायकाला एकत्र आंनंदित पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
झूमच्या रिपोर्टनुसार, मलायका अरोरा आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर यांच्यात काही काळापासून काही ठीक चालले नव्हते. त्यानंतर दोघेही काही काळ वेगळे झाले होते. मात्र कायमचे वेगळे होण्याऐवजी दोघांनी पुन्हा आपल्या नात्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जर मीडिया रिपोर्ट्सनुसार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघेही सोशल मीडियापासून दूर राहून त्यांच्या नात्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मलायका किंवा अर्जुनकडून त्यांच्या नात्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सध्या त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा व्हायरल होताना दिसत आहे.