...अन् दुबईत 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकला किंग खान, 'डंकी'च्या प्रमोशन इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:29 IST2023-12-19T13:23:33+5:302023-12-19T13:29:35+5:30
'डंकी'च्या प्रमोशन दरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

...अन् दुबईत 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकला किंग खान, 'डंकी'च्या प्रमोशन इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडचा किंग खान त्याच्या आगामी 'डंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण, जवाननंतर शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 'डंकी' सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी काहीच दिवस बाकी राहिल्यामुळे या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 'डंकी'च्या प्रमोशन दरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
नुकतंच दुबईमध्ये 'डंकी'चा प्रमोशन इव्हेंट पार पडला. शाहरुखनेही या प्रमोशनला हजेरी लावली होती. किंग खानच्या चाहत्यांनी दुबईतील या इव्हेंटला गर्दी केली होती. चाहत्यांसाठी या इव्हेंटमध्ये शाहरुखने त्याच्या छैय्या छैय्या या आयकॉनिक गाण्यावर डान्स करत दुबईतील चाहत्यांना देसी वाइब्स दिल्या. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शाहरुख 'छैय्या छैय्या' गाण्यावर थिरकताना दिसत असून गाण्याच्या हूक स्टेपही करत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या 'डंकी'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. डंकीचा ट्रेलर पाहिल्यानंतर या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. येत्या २२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून शाहरुखने या चित्रपटात हार्डी हे पात्र साकारलं आहे. शाहरुखबरोबर या चित्रपटात विकी कौशल, तापसी पन्नू, विक्रम कोचर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'डंकी'च्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगमधून शाहरुखच्या सिनेमाने प्रदर्शनाआधीच कोटींची कमाई केली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाची तब्बल २ लाख ५५ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. यातून 'डंकी' चित्रपटाने ७ कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाआधीच बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.