Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृष्यम 2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:21 IST2022-12-15T16:15:20+5:302022-12-15T16:21:52+5:30
रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही चित्रपटाने आपली पकड कायम राखली आहे.

Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृष्यम 2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई, 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील
Drishyam 2 Box Office Collection: अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करतोय. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. 'दृश्यम 2' ला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय देवगण आणि तब्बूच्या दृष्यम 2 ने संपूर्ण जगभरात बॉक्स ऑफिसवर ₹300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मीडिया रिपोर्टनुसार, दृश्यम २ सिनेमानं एकूण वर्ल्डवाईड ३०३ कोटी रुपये कमावले आहेत. 300 कोटींची कमाई करणार दृश्यम २ हा या वर्षीतील तिसरा सिनेमा ठरला आहे. याआधी ब्रह्मास्त्रनं ४३१ कोटी रुपये, 'द काश्मीर फाइल्स'नं ३४१ कोटी रुपये आणि दृश्यम 2 ने 303 कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे. रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही चित्रपटाने आपली पकड कायम राखली आहे.
‘दृश्यम 2’ एका मल्याळम सिनेमाचा हा रिमेक आहे. मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती. अजय देवगणसह ‘दृश्यम 2’मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.