Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:38 AM2022-11-19T11:38:20+5:302022-11-19T11:38:54+5:30

Drishyam 2: अजय देवगण आणि तब्बू यांचा 'दृश्यम 2' १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Drishyam 2: Ajay Devgan's 'Drishyam' made huge money on the first day, know the box office collection | Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम'नं पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

googlenewsNext

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn), श्रिया सरन (Shriya Saran), तब्बू (Tabbu) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांचा 'दृश्यम २' (Drishyam 2) हा चित्रपट रिलीज होऊन एक दिवस झाला आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावरही अनेक चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करेल असा अंदाज आहे. आता याच दरम्यान अजय देवगणच्या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. हे पाहिल्यानंतर निर्माते खूप खूश दिसत आहेत.

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांचा चित्रपट 'दृश्यम 2' काल म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची कमाई पाहिल्यानंतर निर्मात्यांसोबतच चाहतेही खूश आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, अजय देवगणचा चित्रपट 'दृश्यम २' पहिल्या दिवशी अंदाजे बॉक्स ऑफिसवर १४.५० ते १५ कोटींची कमाई करणार आहे. अधिकृत आकडेवारीत बदल पाहिले जाऊ शकतात. पण कमाईचे हे आकडे पाहिल्यानंतर अजय देवगणचा 'दृश्यम २' हा चित्रपट लोकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.


अजय देवगण, श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू यांचा चित्रपट 'दृश्यम २' बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक नवे रेकॉर्ड बनवू शकतो. असा विश्वास आहे की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २'ला मागे टाकू शकतो.

Web Title: Drishyam 2: Ajay Devgan's 'Drishyam' made huge money on the first day, know the box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.