'ड्रीम गर्ल' हेमा मालिनींनी रेखा यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाल्या, 'हिचं वय कधीच...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 16:07 IST2023-10-10T16:04:50+5:302023-10-10T16:07:50+5:30

हेमा मालिनी यांनी रेखा यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत. रेखा हेमा मालिनी यांना मिठाई भरवताना दिसत आहेत.

Dream girl Hema Malini wishes Rekha a happy birthday, says, 'She never ages...' | 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनींनी रेखा यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाल्या, 'हिचं वय कधीच...'

'ड्रीम गर्ल' हेमा मालिनींनी रेखा यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाल्या, 'हिचं वय कधीच...'

सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) यांचा आज वाढदिवस. त्यांच्याकडे बघून वयाचा अंदाजही येणार नाही असं त्यांचं सौंदर्य आहे. आज त्या ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाची सत्तरी आली तरी त्यांची एक नजरही कातिलाना असते. जुनीच काय अगदी नवीन पिढीही त्यांच्या प्रेमात आहे. ७० ते ८० च्या काळात रेखा यांनी हिंदी सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवलं. तर त्यांना टक्कर देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini). हेमा मालिनी यांनी आपल्या लाडक्या मैत्रिणीसाठी खास पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेमा मालिनी यांनी रेखा यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत. यामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोही आहे. या फोटोत रेखा हेमा मालिनी यांना मिठाई भरवताना दिसत आहेत. हेमा मालिनी लिहितात, "आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. अनेक वर्षांपासूनची माझी खास मैत्रिण रेखाचा आज वाढदिवस आहे. या सुंदर, एव्हरग्रीन महिलेचा आज वाढदिवस साजरा करायचा आहे. तसं तर तिच्यासाठी वेळही स्तब्ध होते आणि तिचं वय कधीच दिसत नाही. प्रिय मैत्रिणी, आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. देव तुझं नेहमी भलं करो. खूप प्रेम.'

हेमा मालिनी आणि रेखा यांनी 'धर्मात्मा','अपने अपने' यासारख्या सिनेमात एकत्र काम केलं आहे. तेव्हा दोघीही एकमेकांच्या प्रतिस्पर्धी होत्या. मात्र आज दोघीही खास मैत्रिणी आहेत. त्यांना अनेकदा इव्हेंट्स, अवॉर्ड फंक्शन किंवा सणासुदीला एकत्र पाहिलं गेलं आहे. आज हेमा मालिनी यांनी खास मैत्रिणीवरचं प्रेम व्यक्त करत तिच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. 

Web Title: Dream girl Hema Malini wishes Rekha a happy birthday, says, 'She never ages...'