Don 3 Updates: 'या' दिवशी सुरु होणार रणवीर सिंगच्या 'डॉन ३' सिनेमाचं शूटिंग, समोर आली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:29 IST2025-11-24T14:25:37+5:302025-11-24T14:29:24+5:30
रणवीर सिंगच्या डॉन ३ शूटिंगबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या

Don 3 Updates: 'या' दिवशी सुरु होणार रणवीर सिंगच्या 'डॉन ३' सिनेमाचं शूटिंग, समोर आली मोठी अपडेट
बॉलिवूडची सर्वात यशस्वी फ्रँचायझीपैकी एक असलेल्या 'डॉन'च्या तिसऱ्या भागाची सिनेरसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याची सुरुवात १९७८ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉकबस्टर 'डॉन'पासून झाली होती, त्यानंतर २००६ मध्ये शाहरुख खानने ही फ्रँचायझी यशस्वीपणे पुढे नेली. आता शाहरुख खानच्या जागी अभिनेता रणवीर सिंग 'डॉन ३' मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखेबद्दल आता एक मोठे अपडेट समोर आले आहे.
माहितीनुसार, रणवीर सिंगच्या 'डॉन ३' चित्रपटाचे शूटिंग १५ जानेवारी २०२६ ला सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. जर शूटिंग वेळेवर सुरू झाले, तर हा चित्रपट २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. रणवीर सिंगने या चित्रपटासाठी शाहरुख खानची जागा घेतल्यापासून प्रेक्षक रणवीर 'डॉन' कसा साकारतो, याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
चित्रपटाच्या कास्टिंगवर सध्या काम सुरू असले तरी, 'डॉन ३' मध्ये मुख्य खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार, याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगच्या विरोधात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा 'डॉन ३' मध्ये खलनायकाची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. तसेच, अभिनेता विक्रांत मॅसीलाही या चित्रपटात कास्ट करण्याबद्दल बोलणी सुरू आहेत.
सध्या रणवीर सिंग आपल्या आगामी 'धुरंधर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट जवळपास २५० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार झाला आहे. 'धुरंधर' च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात रणवीरसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर माधवन आणि अक्षय खन्ना यांसारखे स्टार्स दिसणार आहेत. 'धुरंधर'च्या प्रदर्शनानंतर काही महिन्यांनी रणवीर 'डॉन ३'चे काम सुरू करण्याची शक्यता आहे.