वडिलांच्या घरात का कधीच रमली नाही कंगना राणौत? हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 10:57 IST2017-08-29T05:27:50+5:302017-08-29T10:57:50+5:30

कंगना राणौत तिच्या चित्रपटांसाठी तर ओळखली जातेच. याशिवाय परखड बोलण्यासाठीही लोक तिला ओळखतात.  नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात कंगनाच्या याच ...

Does Kangana Ranaut never get their father's house? This is because !! | वडिलांच्या घरात का कधीच रमली नाही कंगना राणौत? हे आहे कारण!!

वडिलांच्या घरात का कधीच रमली नाही कंगना राणौत? हे आहे कारण!!

गना राणौत तिच्या चित्रपटांसाठी तर ओळखली जातेच. याशिवाय परखड बोलण्यासाठीही लोक तिला ओळखतात.  नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात कंगनाच्या याच स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.  मी बॉलिवूडमध्ये काम करायला आले तेव्हा सगळ्यांना माझे दिसणे, माझा रंग खटकला. त्यांना केवळ माझी हरियाणवी भाषा तेवढी आवडली. कारण हरियाणवी ढब कधीच कुठल्या चित्रपटात दिसली नव्हती. मी राजपूत घराण्यातील आहे. इथे आजही बायका हातभर पदरात राहतात. माझे वडिल आणि आजोबा दोघही जुन्या विचारांचे. एकदा आजोबांचा फोन आला. मलाही त्यांच्यासोबत बोलायचे होते. पण वडिलांनी नकार दिला. मग मी जरा चिडले आणि मला आजोबांशी बोलायचेयं, असे जोरात ओरडले. वडिलांना माझे ते चिडणे आवडले नाही आणि त्यांनी माझ्या जोरदार थोबाडीत लगावली. माझे वडिल माझ्या भावाला कायम, तू कमांडो होणार असे म्हणायचे. पण मी काय होणार असे विचारले की, तुझे लग्न होणार, असे सांगून मला चूप बसवायचे. माझे वडिल शिक्षणाविरोधात नव्हते. पण ते मला पॅकेज समजायचे. मला वडिलांचे ते घर कधीच आपले वाटले नाही.  त्या घरात मला गुदमरायला व्हायचे. मुंबईतील माझे घर, हेच मला माझ्या घरासारखे वाटते, असे कंगना म्हणाली.  बॉलिवूडमधील पुरस्कार सोहळ्यांवरही तिने वाक्बाण सोडला. आपल्या अवार्ड शोमध्ये प्रचंड हेराफेरी होते. तुम्हाला हा - हा पुरस्कार दिला जाईल, मात्र यामोबदल्यात तुम्हाला अवार्ड शोमध्ये परफॉर्मन्स द्यावा लागेल, असे तुम्हाला आधीच सांगितले जाते. त्यामुळे मी कायम अशा अवार्ड शोपासून दूर राहते, असे कंंगना म्हणाली.  

ALSO READ : कंगना राणौत सुसाट ! कथालेखनाचे श्रेय घेतल्यानंतर ‘सिमरन’च्या एडिटींग टेबलवर कब्जा!!

 कंगनाने अलीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार केला होता. घराणेशाहीवरून दिग्दर्शक व निर्माता करण जोहरला तिने सुनावले होते. करणच्याच ‘कॉफी विद करण’मध्ये जावून कंगनाने त्याला ‘मुव्ही माफिया’ संबोधले होते. 

Web Title: Does Kangana Ranaut never get their father's house? This is because !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.