तापसी पन्नूच्या 'दोबारा'चे पहिल्याच दिवशी वाजले 'तीन तेरा'... चित्रपटाचे अनेक शो झाले रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 15:00 IST2022-08-20T14:49:37+5:302022-08-20T15:00:06+5:30
तापसीच्या 'दोबारा' चित्रपटाकडे उत्तम स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी थिएटरमध्ये फक्त २-३ टक्के प्रेक्षक संख्या अनुभवली.

तापसी पन्नूच्या 'दोबारा'चे पहिल्याच दिवशी वाजले 'तीन तेरा'... चित्रपटाचे अनेक शो झाले रद्द
तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि अनुराग कश्यप (Anurag Kashyap)4 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यांचा 'दोबारा' हा एक सायन्स फिक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटाला स्क्रिनिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि समीक्षकांकडूनही या चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले होते. शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्याच दिवशी चित्रपटला बॉक्स ऑफिसवर बराच संघर्ष करावा लागतो आहे.
तापसी पन्नूसोबत या चित्रपटात पावेल गुलाटी आणि राहुल भट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि अनुरागच्या 'दोबारा' चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी थिएटरमध्ये फक्त २-३ टक्के प्रेक्षक संख्या अनुभवली. उत्तम स्टारकास्ट असूनही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. त्यामुळे 'दोबारा'चे पहिल्याच दिवशी अनेक शो वेगवेगळ्या थिएटरमध्ये रद्द करण्यात आले. केवळ 275 ते 300 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून फारशी आशा उरलेली नाही.
तेलुगू,अभिनेता निखिल सिद्धार्थच्या 'कार्तिकेय 2' (Karthikeya 2) या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनच्या कमाईने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. भगवान श्रीकृष्ण, पौराणिक कथा आणि साहस यांचा कॉम्बिनेशन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आहे.
तापसी ही बॉलिवूडमधील ए-लिस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे जी एका वर्षात सर्वाधिक चित्रपट करते. त्यांचा 'थप्पड' लॉकडाऊनच्या अगदी आधी रिलीज झाला होता, त्याचं 'हसनी दिलरुबा', 'रश्मी रॉकेट' आणि 'लूप लपेटा' लॉकडाऊन दरम्यान OTT वर रिलीज झाले होते.