'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 17:56 IST2024-11-16T17:55:05+5:302024-11-16T17:56:43+5:30
डिंपल असलेल्या या मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते. ही मुलगी आता कुठे आहे माहीत आहे का...?

'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
अनिल कपूर (Anil Kapoor) आणि श्रीदेवी (Sridevi) यांचा चित्रपट 'मिस्टर इंडिया' (Mr. India) सुपरहिट ठरला. या चित्रपटात भरपूर कॉमेडी, ॲक्शन आणि रोमान्स होता. चित्रपटात मुलांची फौजही दिसली, ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित केले. पण चित्रपटात 'टीना'ची भूमिका साकारणाऱ्या मुलीच्या निरागसते आणि गालावरील डिंपलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ती सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे आणि एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. नुकतेच तिचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहून तिला आता ओळखणं कठीण झाले आहे.
'मिस्टर इंडिया' चित्रपटात टीनाने आपल्या निरागस अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. सिनेमात बॉम्बस्फोटात तिचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे. हा सीन पाहून अनेकजण भावुक झाले होते आणि त्यामुळेच आजही ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या चित्रपटात टीनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव हुजान खोदाईजी (Huzaan Khodaiji) आहे. हुजान खोदाईजी आता खूप मोठी झाली आहे. आता ती सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. तिचे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहिल्यानंतर चाहते तिला ओळखू शकत नाहीत.
हुजान खोदाईजीचे सोशल मीडियावर प्रोफाइल आहेत, परंतु तिने तिचे प्रोफाइल खाजगी ठेवले आहे. तरीही चाहत्यांना तिचे फोटो कुठूनतरी मिळतात. सध्या व्हायरल होत असलेल्या हुजान खोदाईजीचे फोटोत ती खूपच क्यूट दिसत आहे. तिच्या गालावरील डिंपल्स तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा तिच्या क्यूटनेसच्या प्रेमात पडले आहेत.
वर्कफ्रंट
मिस्टर इंडियामध्ये काम केल्यानंतर हुजान इतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. ती लिंटास नावाच्या कंपनीत जाहिरात एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत आहेत.