मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 16:29 IST2020-10-09T16:29:26+5:302020-10-09T16:29:51+5:30
नुकताच रणबीर कपूरची एका नव्या इलेक्ट्रिक बाईकवर फिरताना दिसला. लाल रंगाची ही ई-बाईक आकर्षक तर आहेच.

मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्...
बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच मुंबईच्या रस्त्यांवर महागड्या कार्स आणि बाइक्ससोबत बघायला मिळतात. अनेक सेलिब्रिटी स्वत: बाईक चालवतानाही दिसले आहेत. नुकताच रणबीर कपूरची एका नव्या इलेक्ट्रिक बाईकवर फिरताना दिसला. लाल रंगाची ही ई-बाईक आकर्षक तर आहेच. सोबतच या बाईकची किंमतही हैराण करणारी आहे. ही साधी आणि लहान दिसणाऱ्या बाईकची किंमत मोटारबाईकपेक्षाही जास्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार रणबीर कपूरच्या या नव्या ई-सायकलची किंमत १.५ लाख रूपयांच्या आसपास आहे. या सायकलचे रूंद टायर आणि या सायकल फोल्डेबल क्लालिटीमुळे ही ई-सायकल इतरांपेक्षा वेगळी ठरते. ऐकायला तर असंही मिळालंय की, ही सायकल रणबीरने आलिया भट्टला गिफ्ट केली आहे. ही सायकल तयार करणाऱ्या कंपनीने त्यांच्या ऑफिशिअल पेजवर या सायकलच्या फोटोत आलियाला टॅग केलं होतं.
रणबीरच्या कामाबाबत सांगायचं तर तो शेवटचा संजय दत्तचा बायोपिक संजूमध्ये दिसला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. आता रणबीर कपूरचे २ सिनेमे येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. 'शमशेरा' मध्ये तो वाणी कपूर आणि संजय दत्तसोबत दिसणार आहे. तसेच अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्रमध्ये तो आलियासोबत दिसणार आहे. यात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉयचीही भूमिका असणार आहे.