'वडिलांसारखा होऊ नकोस'; सनीच्या लेकाला धर्मेंद्रने दिला होता सल्ला, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 01:10 PM2023-09-05T13:10:22+5:302023-09-05T13:12:38+5:30

Dharmendra: राजवीर लवकरच 'दोनो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

do-not-try-to-be-like-your-father-dharmendra-gives-advice-to-sunny-deol-son-rajveer-deol | 'वडिलांसारखा होऊ नकोस'; सनीच्या लेकाला धर्मेंद्रने दिला होता सल्ला, कारण..

'वडिलांसारखा होऊ नकोस'; सनीच्या लेकाला धर्मेंद्रने दिला होता सल्ला, कारण..

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सनी देओल याचा 'गदर 2' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल आहे. आजवरच्या कारकिर्दीत सनीने अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत त्याचा समावेश केला जातो. आज सनीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे अनेक जण त्याला फॉलो करतात. परंतु, आपल्या नातवाने सनीसारखं होऊ नये असं धर्मेंद्र यांना वाटतं. याविषयी त्यांनी त्यांच्या नातवाला एक मोलाचा सल्लाही दिला होता.

सनीचा मोठा लेक करण याच्या पाठोपाठ आता त्याचा धाकटा मुलगा राजवीरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. राजवीर लवकरच 'दोनो' या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत असून त्याचा हा सिनेमा ५ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांची लेक पालोमादेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्यामुळे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. यामध्येच या सिनेमात काम करण्यापूर्वी 'तू सनीसारखा होऊ नकोस', असा सल्ला धर्मेंद्र यांनी राजवीरला दिला होता. याविषयी राजवीरने ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात खुलासा केला.

नुकताच दोनोचा ट्रेलर लॉन्च झाला. यावेळी सनी, बॉबी आणि करण हे तिघंही राजवीरसोबत उपस्थित होते. यावेळी 'आजी-आजोबांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी तुला कोणता सल्ला दिला?' असा प्रश्न विचारला. त्यावर, " मी कलाविश्वात पदार्पण करतोय हे पाहून त्यांना खूप आनंद झालाय. पण, तुझं व्यक्तिमत्त्व खूप चांगलं आहे. त्यामुळे वडिलांची प्रतिमा पाहू नकोस. त्यांच्यासारखं व्हायचा प्रयत्न करु नकोस. स्वत:ला सिद्ध कर. तुझ्यावर खूप चांगले संस्कार झाले आहेत. त्यामुळे आजोबा आणि काकासारखा होऊ नकोस", असा सल्ला मिळाल्याचं राजवीरने सांगितलं.

Web Title: do-not-try-to-be-like-your-father-dharmendra-gives-advice-to-sunny-deol-son-rajveer-deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.