दीया मिर्झा दिसणार 'ह्या' वेब सीरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 08:00 IST2018-09-05T15:36:27+5:302018-09-06T08:00:00+5:30
'मुघल्स' या सीरिजमध्ये दीया मिर्झा बाबरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

दीया मिर्झा दिसणार 'ह्या' वेब सीरिजमध्ये
दिग्दर्शक निखिल आडवाणीची 'पीओडब्ल्यू : बंदी युद्ध के' ही मालिका यशस्वी झाल्यानंतर आता तो एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सीरिजचे नाव आहे 'मुघल्स'. या सीरिजमध्ये दीया मिर्झा बाबरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
'मुघल्स' सीरिजमध्ये दीया मिर्झा बाबरची बहिण खानजदाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजमध्ये भूमिका साकारण्यासाठी तिला इतिहासाच्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागला. ऐतिहासिक भूमिका करायला मिळत असल्यामुळे मी खूप खूश आहे. निखिल आडवाणी व माझी आवडती अभिनेत्री शबाना आझमी व रोनित रॉय यांच्यासोबत काम करायला मी खूप उत्सुक आहे. या सीरिजमध्ये मला खूप मेहनत करावी लागणार आहे.
'मुघल्स' सीरिजमध्ये रोनित बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शबाना आझमी बाबरची आजी एसान दौलतच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या बाबरला वयाच्या बाराव्य वर्षी त्याचे वडील उमर शेख यांचे निधन झाल्यानंतर राजपद देतात. या सीरिजच्या चित्रीकरणाला जयपूरमध्ये सुरूवात झाली आहे. ही सीरिज अॅलेक्स रुथेरफोर्डच्या मुघल या कादंबरीवर आधारीत आहे. या कादंबरीची सुरूवात बाबरपासून होते आणि औरंगजेबवर संपते. या सीरिजची कथा भवानी अय्यर यांच्या लेखणीतून साकार झाली आहे. या सीरिजचे संवाद कौसर मुनीर यांनी लिहिलेत.
या सीरिजबाबत निखिल आडवाणीने एका वेबसाईटला सांगितले की, 'जयपूरचे चित्रीकरण आटपल्यानंतर कर्जतला शूटिंग करणार आहेत. '
'मुघल्स' या सीरिजमध्ये दीया मिर्झा, शबाना आझमी व रोनित रॉय या कलाकारांना पाहणे कमालीचे ठरणार आहे.