निर्मात्याच्या प्रेमापोटी अभिनेत्रीने बदलला होता धर्म, लग्नानंतर वर्षभरातच झाला दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:14 IST2026-03-06T11:10:38+5:302026-03-06T11:14:39+5:30

Bollywood actress: या अभिनेत्रीने ज्या निर्मात्यावर प्रेम केलं त्याच्यासोबत संसारही थाटला. परंतु, लग्नाच्या वर्षभरामध्येच तिने जगाचा निरोप घेतला.

divya-bharti-died-after-11-month-marriage-to-muslim-producer-sajid-nadiadwala | निर्मात्याच्या प्रेमापोटी अभिनेत्रीने बदलला होता धर्म, लग्नानंतर वर्षभरातच झाला दुर्दैवी अंत

निर्मात्याच्या प्रेमापोटी अभिनेत्रीने बदलला होता धर्म, लग्नानंतर वर्षभरातच झाला दुर्दैवी अंत

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली. यात काहींचं प्रेम यशस्वी झालं. तर, काहीची लव्हस्टोरी मात्र अपूर्णच राहिली. यामध्येच एका लोकप्रिय अभिनेत्रीची लव्हस्टोरीही प्रचंड गाजली. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने ज्या निर्मात्यावर प्रेम केलं त्याच्यासोबत संसारही थाटला. परंतु, लग्नाच्या वर्षभरामध्येच तिने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे तिची पर्सनलाइफ प्रचंड चर्चेत राहिली.

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती (divya bharti). कमी वयात दिव्याने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळे त्याकाळी ती टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. दिव्याने प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवाला यांच्यासोबत लग्नगाठही बांधली होती. इतकंच नाही तर त्यांच्याशी लग्न व्हावं यासाठी त्यांनी धर्मपरिवर्तनही केलं होतं असं म्हटलं जातं.  

त्याकाळी दिव्या भारतीच्या प्रेमात अनेक दिग्गज कलाकार होते. मात्र, दिव्याने तिचा लाइफ पार्टनर म्हणून साजिद नाडियादवाला यांची निवड केली. दिव्याने साजिदसाठी तिचा धर्म बदलला आणि इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर तिने तिचं नाव बदलून सना नाडियादवाला असं केलं होतं. या जोडीने मे १९९२ मध्ये लग्न केलं. परंतु, या लग्नाला केवळ ११ महिने झाले असतांनाच दिव्याचा मृत्यू झाला.

लग्नानंतर ११ महिन्यातच दिव्याचा मृत्यू

दिव्या आणि साजिद यांच्या लग्नाला फक्त ११ महिने झाले होते. आणि, १९९३ मध्ये तिचा घराच्या बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. परंतु, तिच्या मृत्युमुळे साजिद पुरते हादरुन गेले.

दरम्यान, दिव्याच्या मृत्यूनंतर ७ वर्षानंतर साजिद यांनी वर्धा खान हिच्यासोबत लग्न केलं. आज या जोडीला दोन मुलेदेखील आहेत. तर, दिव्याने १९९० मध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवल्यानंतर दिव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि रातोरात स्टार झाली. शोला और शबनम या सिनेमाच्या सेटवर साजिद आणि दिव्या यांची पहिली भेट झाली होती.

Web Title : निर्माता के प्यार में अभिनेत्री ने बदला धर्म, शादी के एक साल में दुखद अंत

Web Summary : बॉलीवुड स्टार दिव्या भारती ने निर्माता साजिद नाडियाडवाला से शादी करने के लिए इस्लाम धर्म अपनाया। शादी के एक साल के भीतर ही उनका दुखद निधन हो गया, जिससे अटकलें तेज हो गईं। नाडियाडवाला ने सात साल बाद दूसरी शादी की।

Web Title : Actress Changed Religion for Producer, Died Tragically Within a Year

Web Summary : Divya Bharti, a Bollywood star, converted to Islam to marry producer Sajid Nadiadwala. She tragically passed away within a year of their marriage, sparking much speculation. Nadiadwala remarried after seven years.