दिशा पाटनीने हातावर कुणाच्या नावाचा काढला टॅटू ? चाहत्यांनी प्रभासशी सोडला संबंध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 11:45 IST2024-07-02T11:26:16+5:302024-07-02T11:45:18+5:30
अभिनेत्री दिशा पटानी कायम चर्चेत असते.

दिशा पाटनीने हातावर कुणाच्या नावाचा काढला टॅटू ? चाहत्यांनी प्रभासशी सोडला संबंध!
अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) कायम चर्चेत असते. अलिकडेच ती सुपरस्टार प्रभासच्या 'कल्की 2898 AD' चित्रपटात झळकली. सिनेमातील दिशाच्या हॉट अवतारानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटात प्रभास आणि दिशा व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हासन हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. यातच दिशाचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या हातावर 'PD' लिहिलेले दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दिशा ही निळ्या रंगाच्या टॉपमध्ये सुंदर दिसतेय. दिशाने हातावर PD असा टॅटू काढल्याचं दिसून आलं आहे. तिनं हा टॅटू नेमका कोणाच्या नावावरुन काढलाय, याचा अर्थ काय, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. चाहत्यांनी दिशाच्या या टॅटूचा संबंध थेट सुपरस्टार प्रभासशी जोडला आहे. यासोबतच काही जणांनी PD चा अर्थ हा 'पटानी दिशा' असा लावला आहे. मात्र, याप्रकरणी दिशाकडून काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.
दिशा पटानी आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या माध्यमातून पदार्पण करणाऱ्या दिशाने 'बागी 2', 'मलंग', 'भारत', 'राधे योर मोस्ट वांटेड भाई', 'योद्धा' सारख्या गाजलेल्या सिनेमांत दिशाने काम केलं आहे. याशिवाय, दिशा लवकरच 'वेलकम टू द जंगल' या सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिशाने आतापर्यंत टायगर श्रॉफ ते सलमान खानसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे.