प्रभासच्या बिग बजेट सिनेमात दीपिका पादुकोणनंतर झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, 'Project ke' आहे या कारणामुळे स्पेशल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:13 IST2022-05-09T13:12:28+5:302022-05-09T13:13:07+5:30
'बाहुबली' फेम प्रभास(Prabhas)चा चित्रपट 'प्रोजेक्ट के' (Project K)मध्ये दीपिका पादुकोण(Deepika Padukone)सोबत आता आणखी एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

प्रभासच्या बिग बजेट सिनेमात दीपिका पादुकोणनंतर झाली 'या' अभिनेत्रीची एन्ट्री, 'Project ke' आहे या कारणामुळे स्पेशल
बाहुबली फेम साउथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या प्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन (Nag Ashwin) दिग्दर्शित 'प्रोजेक्ट के' (Project K) मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) दिसणार आहे. पहिल्यांदाच प्रभास आणि दीपिका रुपेरी पडद्यावर रोमांस करताना दिसणार आहेत. दरम्यान, आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी (Disha Patani).
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास स्टारर चित्रपट निर्मात्यांनी अभिनेत्री दिशा पटानीला प्रोजेक्ट के चित्रपटासाठी विचारले आहे आणि तिने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. पुरी जगन्नाथ आणि वरूण तेज यांच्या लोफर चित्रपटातून दिशा पटानीने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता पुन्हा एकदा ती प्रोजेक्ट केच्या निमित्ताने साउथच्या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री दिशा पटानीने नाग अश्विनच्या चित्रपटात सहभागी झाल्याची एक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे ज्यात फुलांचा बुके आणि कार्ड दिसत आहे.
तर दुसरीकडे पुष्पगुच्छांचा फोटो शेअर करत प्रोजेक्ट केच्या निर्मात्यांनी लिहिले की, डिअर दिशा, प्रोजेक्ट के मध्ये तुझे स्वागत आहे. आम्ही तुला वैजयंती चित्रपटात सहभागी करून घेण्यासाठी उत्सुक आहोत. हा पॅन इंडिया सिनेमांपैकी एक सिनेमा असेल जो बिग बजेट आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास ४०० कोटी इतके आहे. या चित्रपटात प्रभास, दीपिका शिवाय अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. दिशा पटानीदेखील सहकलाकार म्हणून झळकणार आहे. प्रोजेक्ट केचे शूटिंग सध्या हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. या चित्रपटाचे शूटिंग एरी एलेक्सा तंत्रज्ञानावर केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनणारा हा पहिला भारतीय चित्रपट असेल.