दिशा पटनीच्या बहिणीने टेबलवर चढून केला धमाकेदार डान्स, म्हणाली - 'मलाही असा डान्स करायचा आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 13:12 IST2021-11-29T13:12:18+5:302021-11-29T13:12:57+5:30

दिशा पटनी (Disha Patani) सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि तिने तिची बहीण खुशबूचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

Disha Patani shared a video of her sister Khushboo Patani | दिशा पटनीच्या बहिणीने टेबलवर चढून केला धमाकेदार डान्स, म्हणाली - 'मलाही असा डान्स करायचा आहे'

दिशा पटनीच्या बहिणीने टेबलवर चढून केला धमाकेदार डान्स, म्हणाली - 'मलाही असा डान्स करायचा आहे'

बॉलिवूड अभिनेत्री Disha Patani सौंदर्याच्या बाबतीत कुणापेक्षाही कमी नाही. पण सुंदरतेच्या बाबतीत तिला तिची बहीण Khushboo Patan मागे टाकते. नुकतीच खुशबू असं काही करताना दिसली की, तिची बहीण म्हणजे दिशाला ईर्ष्या झाली होती. ती म्हणाली की, मलाही असं करता आलं असतं तर...!

दिशा पटनी (Disha Patani) सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि तिने तिची बहीण खुशबूचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती जगाची पर्वा न करता बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत दिशाने लिहिलं की, 'हॅप्पी बर्थडे...मलाही तुझ्यासारखं नाचता आलं तर बरं झालं असतं, तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे'.

काय करते दिशाची बहीण

दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी भारतीय सेनेत लेफ्टनंट पदावर आहे. दोन्ही बहिणींमध्ये चांगली मैत्री आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे वर्कआउट करतानाचे फोटो बघायला मिळतात. खुशबूचंही ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेज आहे. त्यावर ती तिच्या पोस्ट शेअर करत असते.

खुशबू आणि दिशाचे  अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर बघायला मिळतात. या फोटोंमध्ये तुम्हाला दोन्हीं बहिणींचं बॉन्डींग बघायला मिळतं. दिशानेही बहिणीचे आर्मी ट्रेनिंग दरम्यानचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
 

Web Title: Disha Patani shared a video of her sister Khushboo Patani