VIDEO : ‘अरे, हिने पण चेहरा बिघडवून घेतला...’, दिशा पाटनीला लोकांनी ओळखलंच नाही, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:06 AM2022-04-29T11:06:14+5:302022-04-29T11:08:18+5:30

Disha Patani at Tiger Shroff's 'Heropanti 2' screening : दिशाने टायगरच्या ‘हिरोपंती 2’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली आणि यानंतर सर्वत्र दिशा पाटनीचीच चर्चा रंगली. इव्हेंटचे व्हिडीओ समोर आलेत आणि अनेकांनी दिशाला ट्रोल करायला सुरूवात केली.

Disha Patani attends Tiger Shroff's 'Heropanti 2' screening, get trolled | VIDEO : ‘अरे, हिने पण चेहरा बिघडवून घेतला...’, दिशा पाटनीला लोकांनी ओळखलंच नाही, झाली ट्रोल

VIDEO : ‘अरे, हिने पण चेहरा बिघडवून घेतला...’, दिशा पाटनीला लोकांनी ओळखलंच नाही, झाली ट्रोल

googlenewsNext

Disha Patani at Tiger Shroff's 'Heropanti 2' screening : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) कथित गर्लफ्रेंड दिशा पाटनी (Disha Patani ) दीर्घकाळापासून रूपेरी पडद्यावर झळकलेली नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. काल रात्री दिशाने टायगरच्या ‘हिरोपंती 2’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली आणि यानंतर सर्वत्र दिशा पाटनीचीच चर्चा रंगली. इव्हेंटचे व्हिडीओ समोर आलेत आणि अनेकांनी दिशाला ट्रोल करायला सुरूवात केली. कारण काय तर तिचा बदललेला लुक.

लॅवेंडर कलरचा क्यूट ड्रेस आणि हातात मिनी बॅग घेऊन दिशा या इव्हेंटमध्ये पोहोचली. पण खरं सांगायचं तर क्षणभर तिला कुणी ओळखलंच नाही. होय, कारण ती आधीपेक्षा बरीच वेगळी दिसत होती. तिचा चेहरा पुरता बदलला दिसत होता. तिच्या हातातील मिनी बॅगही चर्चेचा विषय ठरली. यानंतर नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

 दिशाने केली लिप सर्जरी?
दिशाचा बदललेला चेहरा पाहून तिने लिप सर्जरी केल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला. यावरून तिला ट्रोल केलं गेलं. ‘आता ही देखील लिप सर्जरी करू आलीये,’अशी कमेंट एका युजरने केली. ‘हिने पण वाणी कपूरसारखा आपला चेहरा खराब करून घेतला,’अशी कमेंट अन्य एकाने केली. एका युजरने तर तिला ओळखलंच नाही. ‘अरे हिच्या चेहऱ्याला काय झालं, मी तर ओळखलंच नाही,’अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

अनेकांनी दिशाच्या मिनी बॅगचीही खिल्ली उडवली. ‘या माचिस एवढ्या पर्समध्ये हिने काय ठेवलं असावं?’,असा मजेशीर प्रश्न एका चाहत्याने विचारला. ‘ पर्समध्ये पान मसाल्याची पुडी आहे का?’, ‘तिच्या हातात कोणतं कुलूप आहे?’अशा भन्नाट कमेंट्स युजर्सनी केल्यात.
दिशा पाटनीच्या नोज आणि लिप सर्जरीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. दिशा  मात्र अद्याप यावर काहीही बोललेली नाही. पण तिचे आधीचे फोटो आणि आत्ताचे फोटो यात बराच मोठा फरक स्पष्ट दिसतोय. 

दिशा टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं मानलं जातं. अनेकदा ती टायगर श्रॉफसोबत दिसते. अद्याप दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही. पण आताश: हे नातं कुणापासूनही लपून राहिलेलं नाही.

Web Title: Disha Patani attends Tiger Shroff's 'Heropanti 2' screening, get trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.