रोहित शेट्टीने ‘सिम्बा’मधून केली पाच चित्रपटांची घोषणा! पाहा, संपूर्ण यादी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 12:51 IST2018-12-31T12:50:59+5:302018-12-31T12:51:54+5:30

‘सिम्बा’ला मिळालेल्या या तुफान प्रतिसादामागचे एक कारण म्हणजे, रोहितने या चित्रपटातून पाच चित्रपटांची घोषणा केली आहे. होय, ‘सिम्बा’मध्ये रोहितने आपल्या पाच आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

director rohit shetty announced his next 5 films sooryavanshi singham 3 and golmaal 5 in simmba | रोहित शेट्टीने ‘सिम्बा’मधून केली पाच चित्रपटांची घोषणा! पाहा, संपूर्ण यादी!!

रोहित शेट्टीने ‘सिम्बा’मधून केली पाच चित्रपटांची घोषणा! पाहा, संपूर्ण यादी!!

ठळक मुद्देएकीकडे २०१८ मध्ये रिलीज झालेले अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक दणकून आपटले. दुसरीकडे ‘सिम्बा’ने धम्माल केली.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी भन्नाट रसायन आहे. म्हणूनच रोहित शेट्टी इंडस्ट्रीतील अन्य दिग्दर्शकांपेक्षा वेगळा ठरतो. मावळत्या वर्षांत रिलीज झालेल्या रोहितच्या ‘सिम्बा’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे. एकीकडे २०१८ मध्ये रिलीज झालेले अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक दणकून आपटले. दुसरीकडे ‘सिम्बा’ने धम्माल केली. ‘सिम्बा’ला मिळालेल्या या तुफान प्रतिसादामागचे एक कारण म्हणजे, रोहितने या चित्रपटातून पाच चित्रपटांची घोषणा केली आहे. होय, ‘सिम्बा’मध्ये रोहितने आपल्या पाच आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘सिम्बा’ पाहणाऱ्यांना त्याने अगदी चतुराईने या पाच आगामी चित्रपटांचे संकेत दिले आहेत.

सूर्यवंशी

पहिला चित्रपट आहे ‘सूर्यवंशी’. होय, या चित्रपटातून रोहित शेट्टी व अक्षय कुमार पहिल्यांदा एकत्र येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय पोलिस आॅफिसर सूर्यवंशीच्या रूपात दिसणार आहे. रणवीर सिंगनंतर रोहित अक्षय सोबत काम करणार आहे.


सिंघम 3

सूर्यवंशी या चित्रपटानंतर रोहित शेट्टी ‘सिंगम 3’ घेऊन येणार आहे. या चित्रपटात रोहितचा लकी चार्म अजय देवगण पुन्हा एकदा दिसणार आहे. अजयसोबत लवकरच ‘सिंगम 3’ बनवणार, याचे संकेतही रोहितने दिले आहेत.

गोलमाल 5

‘सिम्बा’च्या ‘आंख मारे’ या गाण्यात ‘गोलमाल’ची स्टारकास्ट दिसली. हीच ‘गोलमाल 5’साठी मोठी हिंट आहे. ‘गोलमाल’ सीरीजमधला पहिला चित्रपट ‘गोलमाल’ सन २००६ मध्ये आला होता. त्यानंतर प्रत्येकी दोन वर्षांच्या अंतराने ‘गोलमाल रिटर्न्स’ आणि ‘गोलमाल 3’ रिलीज झाले होते. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल अगेन’ घेऊन आला.

‘सिम्बा 2’

‘सिम्बा’ रिलीज होण्याआधीच ‘सिम्बा 2’ येणार हे स्पष्ट झाले होते. रोहित व करण जोहर यांनी फार पूर्वीच ‘सिम्बा 2’चे संकेत दिले होते. ‘सिम्बा ’ हिट झाल्यावर तर ‘सिम्बा 2’ अगदी कन्फर्म आहे.

‘सिम्बा, सिंघम, सूर्यवंशी कॉप ड्रामा

सिंघम, सिम्बा व सूर्यवंशी एकमेकांना ओळखतात, असे ‘सिम्बा’मध्ये दाखवण्यात आले आहे. अलीकडे एका मुलाखतीत रोहित शेट्टीने एक कॉप ड्रामा क्रिएट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. ज्यात सिंघम, सिम्बा व सूर्यवंशी हे तिन्ही पोलिस अधिकारी एकत्र दिसली. रोहितची ही इच्छा पूर्ण झालीच तर ही जुगलबंदी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसेल.

Web Title: director rohit shetty announced his next 5 films sooryavanshi singham 3 and golmaal 5 in simmba