धक्कादायक! प्रमोशनसाठी 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाने मनिषाचा मृत्यू झाल्याची थेट बातमीच छापली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 09:19 IST2023-03-31T09:18:35+5:302023-03-31T09:19:19+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला एकेकाळची आघाडीची अभिनेत्री.

director mahesh bhat gives ad of manisha koirala is dead for cinema promotion | धक्कादायक! प्रमोशनसाठी 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाने मनिषाचा मृत्यू झाल्याची थेट बातमीच छापली होती

धक्कादायक! प्रमोशनसाठी 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाने मनिषाचा मृत्यू झाल्याची थेट बातमीच छापली होती

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला एकेकाळची आघाडीची अभिनेत्री. मनिषाने अनेक हिट सिनेमे देत बराच काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'बॉम्बे','दिल से','मन' अशा सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. पण तुम्हाला माहितीए का एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने चक्क 'मनिषाचा मृत्यू झाला आहे' अशी अफवा पसरवली होती. 

मनिषाचा मृत्यू झाल्याची जाहिरात छापली

मनिषाचा 1995 साली 'क्रिमिनल' हा सिनेमा रिलीज झाला होता. एक्शन आणि थ्रिलर असलेल्या या सिनेमाचे महेश भट दिग्दर्शक होते. त्यांनीच सिनेमाचं लेखनही केलं होतं. यामध्ये मनिषासोबत नागार्जुन, राम्या कृष्णन यांचीही मुख्य भूमिका होती. त्यावेळी महेश भट यांचे सिनेमे आणि प्रमोशन हटके असायचं. क्रिमिनल सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'मनिषा कोईराला इज डेड' अशी जाहिरातच छापून आणली. या जाहिरातीमुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली होती. मनिषालाही बातमी वाचून धक्का बसला. तिने लगेच महेश भट यांना फोन केला. तेव्हा ते म्हणाले मी हे प्रमोशनसाठी केलंय. मात्र मनिषाला हे अजिबातच आवडलं नव्हतं.

काय होतं कारण

क्रिमिनल सिनेमात मनिषाचा मृत्यू दाखवलेला आहे. म्हणूनच महेश भट यांनी सिनेमाचं अशा प्रकारे प्रमोशन केलं. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात यावं म्हणून त्यांनी हा फंडा आजमवला. मात्र त्यांची ही पद्धत कोणालाच आवडली नाही. हा सिनेमा 
अमेरिकन सिनेमा 'द फ्युजिटिव्ह' वरुन घेतला होता. 

Web Title: director mahesh bhat gives ad of manisha koirala is dead for cinema promotion