'डिस्को डान्सर' फेम निर्माते बी सुभाष यांच्या मुलीचं निधन, गेल्यावर्षी पत्नीनेही घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 17:15 IST2023-07-23T17:12:34+5:302023-07-23T17:15:52+5:30

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते.

Director B Subhash's daughter passed away, his wife also passed away last year | 'डिस्को डान्सर' फेम निर्माते बी सुभाष यांच्या मुलीचं निधन, गेल्यावर्षी पत्नीनेही घेतला जगाचा निरोप

'डिस्को डान्सर' फेम निर्माते बी सुभाष यांच्या मुलीचं निधन, गेल्यावर्षी पत्नीनेही घेतला जगाचा निरोप

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बी सुभाष (B Subhash) यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची मुलगी श्वेता बब्बर हिचा काल २२ जुलै रोजी मृत्यू झाला. तिचं वय ४८ वर्ष होतं. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. श्वेता घरातच चक्कर येऊन पडल्याने तिच्या पाठीला मार लागला होता. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र काल तिने शेवटचा श्वास घेतला. गेल्याच वर्षी बी सुभाष यांच्या पत्नीचंही निधन झालं होतं.

श्वेता बब्बरने रात्री सुमारे १ वाजता कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. १९ जुलै रोजी ती घरातच चक्कर येऊन पडली होती. तिच्या पायाला लकवा आला होता. तर डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, श्वेताच्या पाठीला क्लॉटिंग झालं होतं. या क्लॉटिंगमुळे तिच्या शरिराच्या अन्य अवयवांना रक्तपुरवठा होत नव्हता. शेवटी रात्री तिची प्राणज्योत मालवली. पत्नीच्या निधनानंतर आता लेकही सोडून गेल्याने बी सुभाष पुरते कोसळले आहेत. त्यांचं कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. 

बी सुभाष यांनी मिथुन चक्रवर्तीच्या 'डिस्को डान्सर' या सुपरहिट सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाने मिथून चक्रवर्तीला स्टार बनवलं होतं. श्वेता देखील वडिलांना फिल्मच्या कामात मदत  करत होती. बी सुभाष हे ७९ वर्षांचे असून त्यांना पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार होता.

Web Title: Director B Subhash's daughter passed away, his wife also passed away last year