दिलजीत दोसांझने घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:04 IST2024-06-20T16:03:53+5:302024-06-20T16:04:52+5:30

दिलजीतनं घातलेलं घड्याळ कोणतं, त्याची किंमत किती? जाणून घ्या...

Diljit Dosanjh Wears ₹1.2 Crore 'Diamond Encrusted' Watch On Jimmy Fallon's The Tonight Show | दिलजीत दोसांझने घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत?

दिलजीत दोसांझने घातलेल्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, जाणून घ्या काय आहे खासियत?

अभिनेता दिलजीत दोसांजने बॉलिवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच दिलजीतने हॉलीवूडचा सुप्रसिद्ध शो 'द टुनाईट शो विथ जिमी फॅलोन'ला हजेरी लावली आहे. पण यावेळी चर्चा झाली ती दिलजीत दोसांझच्या घडाळाचीच. दिलजीतनं घातलेलं घड्याळ कोणतं, त्याची किंमत किती? यासारखे प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. 

'द टुनाईट शो विथ जिमी फॅलोन' या शोमध्ये दिलजीतने खास पंजाबी लूक मध्ये हजेरी लावली.  दिलजीत दोसांझ हा कुर्ता, पंजाबी धोती आणि पगडीमध्ये दिसला. यावेळी त्याच्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दिलजीतने डायमंडची घड्याळ घातलीये. दिलजीत दोसांझने ही घड्याळ खास जैन द ज्वेलर्सकडून तयार करून घेतलीये.

 'डाएट सब्या'च्या इंस्टाग्राम स्टोरीजनुसार, स्टेनलेस स्टील, रोझ-गोल्ड सेल्फ-वाइंडिंग घड्याळ हे रॉयल ओक 41 मिमी मॉडेल आहे. ज्याच्या चारही बाजूंना हिरे जडलेले होते. घड्याळाच्या डायलवर गुलाब सोन्याचे काम केलेलं आहे.  दिलजीतने हे घड्याळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने हे घड्याळ अनेक वेळा परिधान केलं आहे. या घड्याळाची किंमत तब्बल 1.2 कोटी रुपये आहे. 
 

केवळ पंजाबीच नव्हे तर हिंदी कलाविश्वातही दिलजीतच्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येणारा दिलजीत आज कोट्यवधींचा मालक आहे. विशेष म्हणजे त्याने एकेकाळी किर्तन करुन आपलं घर सांभाळलं आहे. दिलजीत भारतात किंवा परदेशात कुठेही गेला तरीही तो आपली संस्कृती आणि परंपरा विसरत नाही. दिलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्याची भूमिका असलेला 'अमर सिंह चमकिला' सिनेमा चांगलाच गाजला. याशिवाय तो 'CREW' या हिंदी सिनेमात विशेष भूमिकेत झळकला.
 

Web Title: Diljit Dosanjh Wears ₹1.2 Crore 'Diamond Encrusted' Watch On Jimmy Fallon's The Tonight Show