"सांगण्यास खूप दुःख होतंय की..."; दिलजीत दोसांझने पोस्ट करुन मागितली चाहत्यांची माफी! काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:15 IST2025-01-21T11:13:03+5:302025-01-21T11:15:09+5:30

दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांची माफी मागितली आणि दुःख शेअर केलं.

Diljit Dosanjh is sad post about punjab 95 movie released date postponed | "सांगण्यास खूप दुःख होतंय की..."; दिलजीत दोसांझने पोस्ट करुन मागितली चाहत्यांची माफी! काय घडलं?

"सांगण्यास खूप दुःख होतंय की..."; दिलजीत दोसांझने पोस्ट करुन मागितली चाहत्यांची माफी! काय घडलं?

दिलजीत दोसांझ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिलजीत सध्या त्याच्या 'दिल्लुमिनाटी' या म्यूझिक टूरमुळे जगभरात गाजतोय. दिलजीत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच दिलजीतने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झालीय. काय झालंय नेमकं? दिलजीतने त्याच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या.

दिलजीतच्या पोस्टमुळे चाहत्यांचा हार्टब्रेक

गायक - अभिनेता दिलजीत दोसांझच्या टीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन सर्वांची माफी मागितली. या पोस्टमध्ये दिलजीतने लिहिलंय की, "मी सर्वांची माफी मागतो कारण मला सांगण्यात खूप दुःख होतंय की माझा आगामी पंजाब ९५ हा सिनेमा ७ फेब्रुवारीला रिलीज होणार नाहीये. ही गोष्ट आमच्या हातात नाहीये." अशी पोस्ट दिलजीतने केलीय. या पोस्टवर दिलजीतच्या चाहत्यांनी निराशा दर्शवली आहे. याशिवाय 'पंजाब ९५' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज केला जावा अशी मागणी केलीय.

'पंजाब ९५' सिनेमा वादग्रस्त का ठरतोय?

'पंजाब ९५' सिनेमाचं प्रदर्शन CBFC मुळे लांबणीवर पडत चाललंय. या सिनेमात १९९० दरम्यान पंजाब पोलिसांनी शिख समुदायातील माणसांवर कसा अत्याचार केला होता, याची कहाणी दाखवण्यात आली आहे. त्यामुळेच या सिनेमाभोवती वादाचे ढग जमा झाले आहेत. CBFC ने दिलजीतची प्रमुख भूमिका असलेल्या 'पंजाब ९५' सिनेमावर एकूण १२० कट सांगितले. त्यामुळेच हा सिनेमा आता नियोजीत रिलीज डेटनुसार म्हणजेच ७ फेब्रुवारीला रिलीज होणार नाहीये. 


Web Title: Diljit Dosanjh is sad post about punjab 95 movie released date postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.