दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:58 IST2025-06-24T17:58:27+5:302025-06-24T17:58:59+5:30

दिलजीत दोसांझने घेतली हानिया आमिरची बाजू?

diljit dosanjh breaks silence on controversy sardar ji 3 movie starring pakistani actress hania amir | दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...

दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) मोठा चाहतावर्ग आहे. दिलजीतची प्रत्येकच गाणी तुफान गाजली आहेत. परदेशातूनही दिलजीतला खूप प्रेम मिळालं आहे. शिवाय त्याने 'उडता पंजाब', 'चमकीला' यासारख्या का सिनेमांमधून आपलं अभिनय कौशल्यही दाखवलं. आता त्याचा 'सरदार  जी ३' सिनेमा येत आहे. मात्र हा सिनेमा भारतात प्रदर्शित होणार नाही कारण यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर (Hania Amir) मुख्य भूमिकेत आहे. आता दिलजीतच्या या आगामी सिनेमाला जोरदार विरोध होतोय. यावर खुद्द दिलजीतनेच मौन सोडलं आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत येणाऱ्या सिनेमावरुन दिलजीतला भारतीय प्रेक्षकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. यावर दिलजीतने थेट भाष्य न करता अप्रत्यक्षरित्या मनातलं काय ते सांगितलं आहे. दिलजीतच्या उत्तरावरुन तो पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत उभा आहे हे स्पष्ट कळतं. ग्रॅमी प्रेसिडेंट पनोस पानायला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "जगातील अनेक देशात युद्धाचं वातावरण आहे. यावर आपल्या कोणाचंच नियंत्रण नाही. अशा वेळी संगीतच अशी शक्ती आहे जी देशांना जोडून ठेवते. मी या कलेशी संलग्न आहे याचा मला आनंद आहे. संगीतावरचं प्रेम हे सीमापार जाणारं आहे. प्रत्येकानेच देशांच्या सीमेपेक्षा धरणी मातेवर प्रेम केलं पाहिजे. कारण प्रत्येक देश, प्रत्येक सीमा ही याच धरणी मातेचा भाग आहे."

तो पुढे असंही म्हणाला की "राजकारणावर बोलून मला कोणतीही चूक करायची नाही. राजकारण हे वेगळं क्षेत्र आहे. त्यात पडून मला चूक करायची नाही. माझ्यासाठी माझा प्रत्येक वेळ महत्वाचा आहे आणि मी तो पूर्णपणे जगू इच्छितो."

हानिया आमिरला 'सरदार जी ३'मध्ये कास्ट केल्याने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने दिलजीतच्या भारतातील सर्व प्रोजेक्ट्सवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. 

Web Title: diljit dosanjh breaks silence on controversy sardar ji 3 movie starring pakistani actress hania amir