कंगना रनौतच्या 'थलाइवी' सिनेमातून 11 वर्षानंतर सलमानची हिरोईन करते कमबॅक, जाणून घ्या तिच्या या खास गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 14:40 IST2021-03-24T14:39:36+5:302021-03-24T14:40:31+5:30
Bhagyashree also makes a comeback in movie Thalaivi, in which Kangana Ranaut will be playing lead role.. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलायवी बायोपिक मध्ये भाग्यश्री झळकणार आहे.

कंगना रनौतच्या 'थलाइवी' सिनेमातून 11 वर्षानंतर सलमानची हिरोईन करते कमबॅक, जाणून घ्या तिच्या या खास गोष्टी
९० च्या दशकात अभिनेत्री भाग्यश्री बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रीपैकी एक होती. भाग्यश्रीने बॉलिवूडच्या अनेक स्टार्सबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खान, अक्षय कुमार या कलाकारांचा समावेश आहे.
1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैंने प्यार किया' या सिनेमाने भाग्यश्रीला एका रात्रीत स्टार बनवले. लग्नानंतर भाग्यश्री सिनेमात फारशी झळकली नाही.तब्बल ११ वर्षांनंतर भाग्यश्री पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्यावर आधारित ‘थलायवी बायोपिक मध्ये भाग्यश्री झळकणार आहे.
भाग्यश्री जयललिता यांच्या आई वेधा यांची भूमिका साकारणार आहे. कंगणासह तिचे खूप चांगले बॉन्डिंग क्रिएट झाले आहे. कंगणा ही उत्तम अभिनेत्री आहे. या सिनेमासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. तिच्यासह काम करण्यात एक वेगळाच आनंद मिळाल्याचं तिने सांगितले होते.
कंगना राणौतच्या ‘थलायवी’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांना ट्रेलर इतका आवडला की, त्यांनी कंगनाचे कौतुक सुरु केले. काही लोकांनी मात्र हा ट्रेलर पाहून नको त्या प्रतिक्रिया दिल्यात.
कंगनाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनयापासून राजकीय क्षेत्रापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
3 मिनीट 15 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जयललिता यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पे दाखवण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्यात कंगनाचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे. सिनेमा 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.