दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खानने मलायकाला केलं अनफॉलो? अजूनही Ex पतीला फॉलो करते अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 18:01 IST2024-01-02T18:01:21+5:302024-01-02T18:01:53+5:30
अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याची पहिली पत्नी मलायका अरोराही चर्चेत आली आहे. आता अरबाजने मलायकाला अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दुसऱ्या लग्नानंतर अरबाज खानने मलायकाला केलं अनफॉलो? अजूनही Ex पतीला फॉलो करते अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर त्याची पहिली पत्नी मलायका अरोराही चर्चेत आली आहे. आता अरबाजने मलायकाला अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
शूरा खानशी लग्न केल्यानंतर अरबाजने पहिली पत्नी मलायका अरोराला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्याचं वृत्त आहे. अरबाज इन्स्टाग्रामवर १२७ जणांना फॉलो करतो. यामध्ये तो सलमान खान आणि सोहेल खानला फॉलो करतो. तर अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहानदेखील त्याच्या फॉलोविंग लिस्टमध्ये आहे. पण, अरबाजच्या फॉलोविंग लिस्टमध्ये मलायका कुठेच दिसत नाही.
मलायकाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने तिला अनफॉलो केलं होतं. त्यानंतर २०१७मध्ये त्याने पुन्हा मलायकाला फॉलो करायला सुरुवात केली होती. पण, नेमकं त्याने मलायकाला पुन्हा अनफॉलो कधी केलं, याबाबत नेमकी माहिती नाही. पण, मलायका मात्र अजूनही अरबाजला फॉलो करते.
दरम्यान, मलायका आणि अरबाजने १९९८ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मोठ्या धुमधडाक्यात त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर २०१७मध्ये घटस्फोट घेत ते कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे.