प्रेग्नंट असल्याचे सांगितल्यानंतर पहिल्यांदाच मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर आली दीया मिर्झा, चेहऱ्यावर दिसला ग्लो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 13:37 IST2021-04-07T13:30:05+5:302021-04-07T13:37:10+5:30
Dia mirza spotted in public for the first time after announcing pregnancy : तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो स्पष्ट दिसतो आहे.

प्रेग्नंट असल्याचे सांगितल्यानंतर पहिल्यांदाच मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर आली दीया मिर्झा, चेहऱ्यावर दिसला ग्लो
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले होते. तिने आपला बेबी बम्पसोबतचा सुंदर फोटो पोस्ट करत प्रेग्नेंट असल्याचे सांगितले होते. लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर हनीमूनवर गेलेली असताना,तिथूनच दीयाने हा फोटो शेअर केला होता. फोटोत तिच्या चेह-यावर प्रेग्नंसीमुळे आलेला ग्लोही झळकत होता.
हनीमूनवरुन परतल्यानंतर दीया पहिल्यांदाच पापाराझींच्या समोर आली. दीया यावेळी व्हाईट रंगाचा टॉप आणि ग्रे कार्गोमध्ये दिसली. तिने आपल्या चेहऱ्याला मास्क लावलेला होता. दीया पापाराझींना बघून थांबली आणि तिने कॅमेऱ्यासमोर पोझ देखील दिल्या. यादरम्यान तिचे बेबी बम्पस्पष्ट दिसत होते. दीयाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांचे म्हणणे आहे की तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो स्पष्ट दिसतो आहे.
दीयाला तिच्या प्रेग्नंसीमुळे सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केले गेले. दीया प्रेग्नंट राहिली म्हणून तिने दुसरे लग्न केले असे नेटीझन्स तिच्याविषयी बोलताना दिसत आहेत. मात्र,आता दीयाने प्रेग्नंसीमुळे लग्न केले नसल्याचे सांगितले होते. दीयाचा पती वैभव रैखी हा मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक आहे. दीयाप्रमाणेच वैभवचे देखील हे दुसरे लग्न आहे. सुनैना रेखी असे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. ती एक योगा कोच आहे.