अरे ही प्रेग्नंट आहे की काय, लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच दीयाचा असा फोटो पाहून युजर्सही झाले आवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 18:26 IST2021-02-20T18:04:47+5:302021-02-20T18:26:19+5:30
Dia Mirza makes first public appearance after marrying Vaibhav Rekhi : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न बंधनात अडकली आहे.

अरे ही प्रेग्नंट आहे की काय, लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच दीयाचा असा फोटो पाहून युजर्सही झाले आवाक्
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा नुकतीच बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न बंधनात अडकली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात. दोघांनीही १५ फेब्रुवारीला पाली हिल येथील इमारत बेल एअरमध्ये दीयाचा लग्नसोहळा पार पडला. लग्नानंतर दीया मिर्झाला पहिल्यांदा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली.
दीया मिर्झा प्रेग्नेंट असल्याचा अंदाज तिचे चाहतेदेखील बांधत आहेत. दीयाच्या हृदयावर राज्य करणारा वैभव रेखी कोण आहे तर मोठा बिझनेसमॅन व इव्हेस्टर आहे. वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो. वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये.त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे.
दीयाने मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीयाने हना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.