प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 13:28 IST2026-03-06T13:28:06+5:302026-03-06T13:28:58+5:30

रणवीर सिंहने शेअर केलं पोस्टर, येतोय 'धुरंधर: द रिव्हेंज'चा ट्रेलर

dhurandhar the revenge trailer will be out tomorrow makers official announcement | प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख

प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच महिन्यात म्हणजेच १९ मार्च रोजी सिनेमा रिलीज होणार आहे. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर कधी येणार याची याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. ट्रेलर रिलीज पुढे ढकलल्याचीही बातमी आली होती. मात्र आता चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. रणवीर सिंहने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत ट्रेलर कधी रिलीज होणार जाहीर केले आहे.

'धुरंधर २' चं टायटल 'धुरंधर: द रिव्हेंज' आहे. याचा बहुप्रतिक्षित ट्रेलर उद्या म्हणजेच ७ मार्च रोजी रिलीज होणार आहे. आधी ट्रेलर ३ मार्च रोजी होळीला येणार होता अशी चर्चा होती. नंतर ६ मार्च तारीख आली होती. तर आता मेकर्सकडून अधिकृत घोषणा झाली आहे. उद्या ७ मार्च रोजी सकाळी ११.०१ वाजता ट्रेलर आउट होणार आहे. रणवीर सिंहने पोस्टर शेअर करत ही आनंदाचा बातमी दिली आहे ज्यामुळे चाहत्यांमध्ये आतुरता निर्माण झाली आहे.


'धुरंधर: द रिव्हेंज' पहिल्या भागापेक्षाही आणखी जबरदस्त असणार अशीच प्रतिक्रिया सिनेमातील कलाकारांनी दिली. यामध्ये रणवीर सिंहचा भूतकाळ आणि यानंतरचा त्याचा बदला बघायला मिळणार आहे. १९ मार्च रोजी संपूर्ण देश पुन्हा 'धुरंधर'च्या जगात हरवून जाणार आहे. 

१९ मार्च रोजी बॉक्सऑफिसवर 'धुरंधर'सोबत यशचा 'टॉक्झिक'ही रिलीज होणार होता. मात्र मध्य पूर्वेतील तणावामुळे  'टॉक्झिक'ची रिलीज डेट पुढे ढकलली. त्यामुळे आता 'धुरंधर'ला कोणाचीही स्पर्धा राहिलेली नाही. सिनेमा तीन तास ४५ मिनिटे इतका मोठा असणार आहे. सिनेमात रणवीर सिंह, राकेश बेदी, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन यांच्याशिवाय आणखी कोण कलाकार दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Web Title : धुरंधर: द रिवेंज' का ट्रेलर रिलीज की तारीख घोषित; पोस्टर साझा किया

Web Summary : 'धुरंधर: द रिवेंज' का ट्रेलर कल, 7 मार्च को सुबह 11:01 बजे रिलीज होगा। रणवीर सिंह अभिनीत, फिल्म एक बदला कहानी का वादा करती है। फिल्म 19 मार्च को रिलीज होगी। यश की 'टॉक्सिक' की रिलीज स्थगित कर दी गई। फिल्म 3 घंटे 45 मिनट तक चलेगी।

Web Title : Dhurendehar: The Revenge's Trailer Release Date Announced; Poster Shared

Web Summary : The trailer for 'Dhurendehar: The Revenge' releases tomorrow, March 7th, at 11:01 AM. Starring Ranveer Singh, the film promises a revenge story. The film releases on March 19th. Yash's 'Toxic' release was postponed. The film will run for 3 hours and 45 minutes.