'धुरंधर: द रिवेंज'मधील 'या' अभिनेत्याला येतायेत पाकिस्तानी लोकांचे मेसेज, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 11:02 IST2026-04-04T11:02:16+5:302026-04-04T11:02:53+5:30

त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचीही होतेय मागणी, कोण आहे हा अभिनेता?

dhurandhar the revenge actor danish pandor playing uzair baloch role getting praised from pakistan | 'धुरंधर: द रिवेंज'मधील 'या' अभिनेत्याला येतायेत पाकिस्तानी लोकांचे मेसेज, म्हणाला...

'धुरंधर: द रिवेंज'मधील 'या' अभिनेत्याला येतायेत पाकिस्तानी लोकांचे मेसेज, म्हणाला...

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर आता 'धुरंधर: द रिव्हेंज'ही बॉक्स ऑफिसवर वादळ घेऊन आला आहे. सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसंच सोशल मीडियावर सिनेमाचे स्पॉयलर्स, मीम्स व्हायरल होत आहेत. यामध्ये  रहमान डकैतचा भाऊ उजैर बलोचवर बरेच जोक्स व्हायरल झाले आहेत. उजैरला पहिला स्पाय असं लोक म्हणत आहेत याचं कारण सिनेमा पाहिलेल्यांनाच कळेल. दरम्यान उजैरची भूमिका पाकिस्तानमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. यावर अभिनेत्याने नुकताच एक किस्सा सांगितला.

अभिनेता दानिश पंडोरने उजैर बलोचची म्हणजेच रहमान डकैतच्या भावाची भूमिका साकारली. रेडियो सिटी इंडियाशी बोलताना दानिश पंडोर म्हणाला, "लोक मला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवत आहेत. माझ्या भूमिकेला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. 'जस्टिस फॉर उजैर' असं व्हायरल होत आहे. सतत डीएम्स येत आहेत. लोकांचं प्रेम मिळत आहे. लोक मला त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टॅग करत आहेत. त्यांचं इतकं प्रेम पाहून मी कमीत कमी त्यांना रिप्लाय तर नक्कीच देऊ शकतो."

तो पुढे म्हणाला, "पाकिस्तानमधूनही बरेच मेसेज येत आहेत. आप बहुत पसंद आए, दिल खुश कर दिया, कितनी अच्छी मूव्ही बनाई है  अशा प्रतिक्रिया तेथील लोक देत आहेत. याशिवाय कॅनडा, युके, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतूनही लोक स्तुती करत आहेत."

'धुरंधर: द रिव्हेंज'ने रिलीजनंतर काही दिवसातच १००० कोटींची कमाई केली. तर जगभरात १५०० कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबत सिनेमाने बाहुबली २ आणि पुष्पा २ लाही टक्कर दिली आहे. 

Web Title : धुरंधर: द रिवेंज के अभिनेता को पाकिस्तानी प्रशंसकों से मिल रहे संदेश।

Web Summary : 'धुरंधर: द रिवेंज' में उजैर बलोच की भूमिका निभाने वाले दानिश पंडोर को पाकिस्तान से प्रशंसा मिल रही है। उन्हें उनके प्रदर्शन और फिल्म की सराहना करते हुए संदेश मिल रहे हैं। फिल्म ने दुनिया भर में ₹1500 करोड़ से अधिक की कमाई की है, जो 'बाहुबली 2' और 'पुष्पा 2' से अधिक है।

Web Title : Dhurandhar: The Revenge actor receives messages from Pakistani fans.

Web Summary : Danish Pandor, who played Ujair Baloch in 'Dhurandhar: The Revenge,' is receiving praise from Pakistan. He's getting messages appreciating his performance and the movie. The film has grossed over ₹1500 crore worldwide, surpassing 'Baahubali 2' and 'Pushpa 2'.