जानेवारीतील 'या' तारखेपासून घरबसल्या पाहू शकाल 'धुरंधर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:11 IST2026-01-15T14:44:42+5:302026-01-15T15:11:03+5:30
रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'धुरंधर' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

जानेवारीतील 'या' तारखेपासून घरबसल्या पाहू शकाल 'धुरंधर', कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित?
आदित्य धर दिग्दर्शित, रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर 'धुरंधर' हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ४० दिवसांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. मात्र, जे प्रेक्षक हा चित्रपट घरबसल्या पाहण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
'धुरंधर' हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'धुरंधर'चे डिजिटल हक्क नेटफ्लिक्स या दिग्गज ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत. यासाठी सुमारे २८५ कोटी रुपयांचा मोठा करार झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येत्या ३० जानेवारीपासून नेटफ्लिक्स युजर्स हा चित्रपट घरबसल्या पाहू शकतील. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीज तारखेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंगसोबतअक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'धुरंधर' हा दोन भागांत विभागला गेला असून, त्याचा दुसरा भाग म्हणजेच 'धुरंधर २' मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
'धुरंधर'नं किती कोटींची केली कमाई?
'धुरंधर' या चित्रपटाने आतापर्यंत छप्परफाड कमाई केली आहे. समोर आकडेवारीनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत ८६६.४० कोटी रूपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, ज्या पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे, तिथेही या चित्रपटाच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावलं. चित्रपटात दाखवलेल्या काही संवेदनशील विषयामुळे पाकिस्तान आणि काही आखाती देशांनी यावर बंदी घातली होती. पण तरीही एका अहवालानुसार पाकिस्तानमधील अनेक लोकांनी हा चित्रपट पायरसीच्या माध्यमातून गुपचुप पाहिला असल्याचं उघड झालं.