'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 15:46 IST2025-12-05T15:46:00+5:302025-12-05T15:46:40+5:30
'धुरंधर'चा सीक्वेल 'या' दिवशी येणार

'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमात सगळे धुरंधर कलाकार आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि आर माधवनची भूमिका आहे. सिनेमा तब्बल साडेतीन तासांचा आहे. इतकंच नाही तर आज रिलीज झालेला सिनेमा हा पहिलाच पार्ट आहे. याचा दुसरा पार्टही लवकरच रिलीज होणार आहे. मेकर्सने दुसऱ्या पार्टची अधिकृत घोषणाही केली आहे.
'धुरंधर पार्ट २' पुढील वर्षी मार्च महिन्यात ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. १९ मार्च २०२६ ही रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. सिनेमाच्या रिलीजपासून पहिल्या भागाच्या क्लायमॅक्सची जोरदार चर्चा आहे. सिनेमाच्या पोस्ट क्रेडिट सीनच दोन मिनिटांचा आहे ज्यात अंगावर काटा आणणारी झलक दिसतेय. विशेष म्हणजे दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना तीनच महिने वाट बघावी लागणार आहे याचा आनंद आहे.
याआधी अभिनेते राकेश बेदी यांनी सिनेमाच्या सीक्वेलवर शिक्कामोर्तब केलं होतं. तसंच दुसऱ्या भागात त्यांची भूमिका आणखी इंटरेस्टिंग असल्याचं ते म्हणाले होते. त्यामुळे आता दुसऱ्या भागाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
सिनेमाच्या रिव्ह्यूबद्दल सांगायचं तर प्रेक्षकांना 'धुरंधर'ची कहाणी, परफॉर्मन्स आणि म्युझिक खूप आवडलं आहे. रणवीरच्या अभिनयाची खूप स्तुती होत आहे. शिवाय अक्षय खन्नानेही सिनेमात दमदार काम केलं आहे. सारा आणि रणवीरची जोडीही योग्य वाटतेय अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे.