असा शूट झाला 'धुरंधर'मधील 'तो' भयानक सीन, अभिनेत्याने शेअर केला BTS व्हिडीओ, पाहून अंगावर येईल काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:57 IST2025-12-18T12:55:32+5:302025-12-18T12:57:35+5:30
जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमातील काही सीन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका सीनचा BTS व्हिडीओ समोर आला आहे.

असा शूट झाला 'धुरंधर'मधील 'तो' भयानक सीन, अभिनेत्याने शेअर केला BTS व्हिडीओ, पाहून अंगावर येईल काटा
'धुरंधर' सिनेमाने प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाऊन टाकलं आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करतो आहे. जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमातील काही सीन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका सीनचा BTS व्हिडीओ समोर आला आहे.
रहमान डकैतच्या मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी गँगस्टर बाबू डकैतच्या गँगमधील गुंडांची हत्या करण्यात येते. संपूर्ण ल्यारी रक्ताच्या थारोळ्यात असतं. यातील एका गुंडाचा रेस्टॉरंटमध्ये खून करण्यात येतो. रेस्टॉरंटमधली उकळत्या जेवणाच्या मोठ्या भांड्यात त्याला लॉक केलं जात. अंगावर काटा आणणारा हा सीन कसा शूट झाला याचा व्हिडीओ 'धुरंधर'मधील अभिनेत्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसतंय की एक व्यक्ती त्या भांड्यात आहे. अॅक्शन म्हणताच अभिनेता डोकं बाहेर काढून हातपाय मारायला सुरुवात करतो. त्यानंतर बाकीचे त्या भांड्याचं झाकण बंद करतात.
'धुरंधर'मधील काही भयानक सीन्सपैकी हा सीन एक आहे. याचा BTS व्हिडीओ पाहतानाही अंगावर काटा येत आहे. दरम्यान ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'धुरंधर' १३ दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमाने ५०० कोटींकडे वाटचाल केली आहे.