"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
By कोमल खांबे | Updated: December 11, 2025 11:42 IST2025-12-11T11:42:11+5:302025-12-11T11:42:55+5:30
'धुरंधर' सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. मात्र या सिनेमातील एक चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. 'धुरंधर'मधील सीन आणि त्यातील गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत. अॅक्शन थ्रिलर स्पाय सिनेमाला प्रेक्षकांचा भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'धुरंधर' सिनेमातील कलाकारांच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे. मात्र या सिनेमातील एक चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
'धुरंधर' सिनेमाचं कथानक हे पाकिस्तानातील गँगस्टर आणि राजकारणाभोवती फिरतं. भारताचा गुप्तेहर पाकिस्तानात जाऊन रहमान डकैतच्या गँगमध्ये सामील होत त्याच्या गुप्त कारवायांची माहिती भारताला देत असतो. हमझा अली बनून पाकिस्तानात राहिलेल्या या भारतीय गुप्तहेराची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानातील परिसर दाखवण्यात आला आहे. त्यामुळे याचं शूटिंग पाकिस्तानात झालंय असंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र 'धुरंधर'मधली एक चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे.
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग आणि सारा अर्जुन एका मॉलमध्ये फिरायला जात असल्याचा सीन आहे. हा मॉल पाकिस्तानात असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. पण, ज्या मॉलमध्ये 'धुरंधर'मधल्या सीनचं शूटिंग झालंय तो पाकिस्तानातील नसून मुंबईतील आहे. मुंबईतील इनॉर्बिट मॉलमध्ये 'धुरंधर'मधला रणवीर आणि साराचा हा सीन शूट करण्यात आला आहे. या सीनच्या शूटवेळचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. "हा तर मालाडमधला मॉल आहे", "पाकिस्तानात मॉल पण आहे का...", "तेच विचार करतेय पाकिस्तानात मॉल कुठून आला?", अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, 'धुरंधर' सिनेमाचा बरासचा भाग हा भारतात शूट झाला आहे. तर काही सीन बँकॉकमध्ये शूट करण्यात आले आहेत. जरी 'धुरंधर'मध्ये पाकिस्तान दाखवण्यात आलं असलं. तरी यातील एकाही सीनचं शूटिंग पाकिस्तानात झालेलं नाही.