रणवीरला टक्कर देणारा 'धुरंधर'मधला हँडसम हंक, उजैर बलोचवर मुली फिदा, म्हणाला- "मला पाकिस्तानातून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 13:41 IST2025-12-18T13:39:59+5:302025-12-18T13:41:02+5:30
अभिनेता दानिश पंडोरने 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतचा छोटा भाऊ असलेल्या उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातूनही दानिशला त्याच्या भूमिकेसाठी प्रेम मिळत आहे.

रणवीरला टक्कर देणारा 'धुरंधर'मधला हँडसम हंक, उजैर बलोचवर मुली फिदा, म्हणाला- "मला पाकिस्तानातून..."
'धुरंधर' सिनेमातील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. रहमान डकैत, हमझा अली यांच्यासोबत उजैर बलोचच्या भूमिकेचीही चर्चा होताना दिसत आहे. अभिनेता दानिश पंडोरने 'धुरंधर'मध्ये रहमान डकैतचा छोटा भाऊ असलेल्या उजैर बलोचची भूमिका साकारली आहे. या भूमिकेने त्याला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातूनही दानिशला त्याच्या भूमिकेसाठी प्रेम मिळत आहे.
'धुरंधर' सिनेमामुळे दानिशचं आयुष्य बदलून गेलं आहे. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत दानिश म्हणाला, "ही खूपच भारी फिलिंग आहे. मला खूप छान वाटत आहे. माझं काम लोकांना आवडत आहे. आमच्या मेहनतीचं चीज होताना दिसत आहे. आम्ही या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली. मी दीड वर्ष या सिनेमासाठी तयारी करत होतो. तर आदित्य सरांनी ५ वर्ष सिनेमासाठी दिली आहेत. मला पाकिस्तानातूनही प्रेम मिळत आहे. तुमची भूमिका लोकांना आवडतेय यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते".
"मी माझ्या भूमिकेवर खूप मेहनत घेतली होती. मी चालण्याची प्रॅक्टिस करत होतो. ही भूमिका साधी ठेवायची आहे असं आदित्य सरांनी मला सांगितलं होतं. भूमिका समजण्यासाठी मला २-३ दिवस गेले. त्यानंतर मी भूमिकेत सामावून गेलो. त्यामुळेच लोक माझ्या भूमिकेवर इतकं प्रेम करत आहेत. माझ्या सगळ्या चाहत्यांना मी धन्यवाद म्हणू इच्छितो", असंही दानिश म्हणाला. दरम्यान ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'धुरंधर' १३ दिवसानंतरही बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमाने ५०० कोटींकडे वाटचाल केली आहे. या सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत.