'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:28 IST2025-12-20T15:28:00+5:302025-12-20T15:28:52+5:30
Dhurandhar Movie : 'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर यांचे दिग्दर्शन आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमात अशा सहा टीव्ही स्टार्सनी आपल्या कामगिरीने प्रेक्षकांना चकित केले आहे. चला तर मग, या कलाकारांवर एक नजर टाकूया.

'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
'धुरंधर' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आदित्य धर यांचे दिग्दर्शन आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. रणवीरसोबतच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांसारख्या ताकदीच्या कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटात जीव ओतला आहे. या दिग्गज कलाकारांशिवाय टीव्हीवरील अनेक लोकप्रिय चेहऱ्यांच्या उपस्थितीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'धुरंधर'मध्ये अशा सहा टीव्ही स्टार्सनी आपल्या कामगिरीने प्रेक्षकांना चकित केले आहे, ज्यामुळे कथेला एक वेगळीच खोली मिळाली आहे. चला तर मग, या कलाकारांवर एक नजर टाकूया.
सौम्या टंडन :
रेहमान डकैतची पत्नी 'उल्फत हसीन'ची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनचे 'भाभीजी घर पर हैं' मधील कामासाठी खूप कौतुक झाले आहे. गेल्या काही वर्षांत तिने 'डान्स इंडिया डान्स', 'बोर्नविटा क्विझ कॉन्टेस्ट' आणि 'एंटरटेनमेंट की रात' यांसारखे लोकप्रिय शो होस्ट केले आहेत. २००७ मधील गाजलेल्या 'जब वी मेट' चित्रपटातही तिने काम केले होते, मात्र 'धुरंधर'मधील भूमिकेमुळे ती सध्या प्रचंड चर्चेत आहे.
'शरारत' या गाण्यामध्ये क्रिस्टलने अप्रतिम डान्स परफॉर्मन्स दिला आहे. हे गाणे चित्रपटात रणवीर सिंगच्या लग्नाच्या सीनदरम्यान येते. क्रिस्टलला स्टार प्लसवरील 'एक हजारों में मेरी बहना है' मधील 'जीविका' या भूमिकेसाठी विशेष ओळखले जाते.
आयशा खान:
'बिग बॉस १७' फेम आयशा खानने 'शरारत' गाण्यात क्रिस्टलसोबत स्क्रीन शेअर केली असून एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. अलीकडेच ती कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करूं २'मध्येही दिसली होती.
मानव गोहिल:
'कहानी घर घर की', 'सीआयडी', 'अदालत', 'शादी मुबारक' आणि 'तेनाली रामा' अशा अनेक सुपरहिट मालिकाचा मानव भाग राहिला आहे. त्याने 'नच बलिये २' आणि 'फियर फॅक्टर इंडिया' सारख्या रिएलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. 'धुरंधर'मध्ये त्याने इंटेलिजन्स ब्युरोचे डेप्युटी डायरेक्टर 'सुशांत बन्सल' यांची भूमिका साकारली आहे.
'धुरंधर'मधील ज्येष्ठ राजकारणी 'जमील जमाली'च्या भूमिकेत राकेश बेदी यांना दुर्लक्षित करणे अशक्य आहे. टेलिव्हिजन, चित्रपट आणि रंगभूमीवरील ४५ वर्षांहून अधिक अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यांनी 'श्रीमान श्रीमती', 'येस बॉस', 'भाभीजी घर पर हैं' आणि 'तारक मेहता का उल्टा चश्मा' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
गौरव गेरा :
९०च्या दशकातील प्रत्येक मुलाला 'जस्सी जैसी कोई नही' मधील 'नंदू' आठवत असेलच. गौरवने 'द ग्रेट इंडियन कॉमेडी शो' आणि 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' मध्येही आपले टॅलेंट दाखवले आहे. 'धुरंधर'मध्ये गौरव एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. तो 'मोहम्मद आलम'ची भूमिका साकारत असून, जो हमजाचा हँडलर आहे आणि 'लियारी'मध्ये एका ज्यूस सेंटरचा मालक म्हणून अंडरकव्हर काम करतो.
'धुरंधर'बद्दल सांगायचं तर, हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून यामध्ये रणवीर सिंगसोबत आर. माधवन, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.